दीड दिवसाच्या बाप्पांना निरोप ;  386 गणेशमूर्ती पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जित

Farewell to Bappa for a day and a half; 386 Ganesha idols immersed in an environmentally friendly manner
Farewell to Bappa for a day and a half; 386 Ganesha idols immersed in an environmentally friendly manner
Updated on

कोल्हापूर  : जिल्हा प्रशासनाने सार्वजनिक गणेशोत्सव साधेपणाने साजरा करतानाच पर्यावरणपूरक विसर्जनाचा आदर्श यंदाही कोल्हापूरकर देणार आहेत. आज दीड दिवसाच्या बाप्पांना निरोप देतानाही स्वयंस्फूर्त प्रतिसाद मिळाला. दरम्यान, महापालिकेने गुरुवारी (ता. 27) गौरी-गणपती विसर्जनादिवशी प्रत्येक प्रभागात 250 ठिकाणी काहिली आणि विसर्जन कुंड ठेवण्याचे नियोजन केले आहे. 


दरम्यान, आज दीड दिवसाच्या मूर्ती विसर्जनासाठी शहरात 70 ठिकाणी विसर्जन कुंड ठेवण्यात आले होते. सायंकाळी महापालिकेच्या चार विभागांत 386 गणेशमूर्ती पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जित करण्यात आल्या. यात दोन सार्वजनिक मंडळांचाही समावेश आहे. दरवर्षी पंचगंगा नदी, रंकाळा, कोटीतीर्थ तलावात गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात येते. पण, यंदा प्रशासनाने नदी आणि तलावात विसर्जनास बंदी घातली आहे. पंचगंगा, कोटीतीर्थ, राजाराम तलाव बॅरिकेटिंग लावून प्रवेशबंदी करण्यात आली आहे. 

आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी यांनी गणेश विसर्जन कुंडांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार घरगुती विसर्जनावेळी शहरातील 81 प्रभागांत सुमारे 250 विसर्जन कुंड ठेवण्यात येणार आहेत. या मूर्तींचे संकलन करण्यासाठी 110 ट्रॅक्‍टर असणार आहेत. प्रत्येक प्रभागातील महत्त्वाचे चौक, बाग, रिकाम्या जागांवर कुंड ठेवले. यात महापलिकेच्या टॅंकरमधून पाणी भरले आणि या कुंडांत विसर्जन केलेल्या गणेशमूर्ती ताब्यात घेण्यासाठी महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी तैनात केले आहेत. आजही दीड दिवसाच्या गणेशमूर्तींचे कोणत्या विसर्जन कुंडात किती मूर्ती विसर्जन झाल्या याची नोंद केली जात आहे. शहरात गंगावेश, रंकाळा तलाव. इराणी खण, राजारामपुरी चौक, तसेच बागांमध्येही विसर्जन कुंड ठेवण्यात आले होते. यानंतर विविध विभागांतील कुंडात विसर्जन झालेल्या मूर्ती ट्रॅक्‍टर ट्रॉलीमधून आणून क्रशर चौकातील दोन खणींत विसर्जन केल्या जात आहेत. आज सायंकाळी पाचपर्यंत विभाग एकमध्ये 117, विभाग दोनमध्ये 113, विभाग तीन 95 विभाग चारमध्ये 61 अशा घरगुती गणेशमूर्ती विसर्जित करण्यात आल्या; तर राजारामपुरी शिवाजी तरुण मंडळासह दोन सार्वजनिक गणेश मंडळांनी दीड दिवसाचा गणेशोत्सव करून मूर्तींचे विसर्जन केले. 

सूज्ञ कोल्हापूरकर..! 
पंचगंगा, रंकाळ्याचा श्‍वास मोकळा करण्यासाठी "सकाळ'ने आवाहन केले आणि पुढे सूज्ञ कोल्हापूरकरांनी "चला, पंचगंगा वाचवूया', "चला, रंकाळा वाचवूया' लोकचळवळी उभ्या राहिल्या. त्याचाच एक भाग म्हणून पर्यावरणपूरक विसर्जनाचा आदर्श कोल्हापूरने राज्याला दिला. यंदाही कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कोल्हापूरकरांनी स्वयंस्फूर्तीनेच पर्यावरणपूरक विसर्जनासाठी पुढाकार घेतला. अनेक मंडळांनी मूर्ती एक्‍स्चेंजची संकल्पना काही वर्षांत स्वीकारली आणि पर्यावरणपूरक विसर्जनावरही आता भर दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com