
बेळगाव-वेंगुर्ला महामार्ग सुमारे अर्धा तास रोखून धरला. पोलिसांना निवेदन देऊन आंदोलनाची सांगता झाली.
चंदगड : पाटणे फाटा ( ता. चंदगड) येथे दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. बेळगाव-वेंगुर्ला महामार्ग सुमारे अर्धा तास रोखून धरला. पोलिसांना निवेदन देऊन आंदोलनाची सांगता झाली.
जंगमहट्टीचे सरपंच विष्णू गावडे म्हणाले, ""दिल्लीच्या सीमेवर दोन महिने आंदोलन सुरू आहे; परंतु केंद्र शासनाकडून त्याला प्रतिसाद दिला जात नाही, ही एक प्रकारे शेतकऱ्यांची चेष्टा आहे.'' मनसेचे जिल्हा उपप्रमुख प्रताप पाटील म्हणाले, शेतकऱ्यांना नको असलेले कायदे लादून केंद्रशासन आपली हुकूमशाही गाजवत आहे. याला शेतकरी म्हणून सर्वांचा विरोध राहील.
शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन हवालदार मकानदार यांच्याकडे देण्यात आले. विलास भावकू पाटील, आनंदराव कांबळे, संदीप सकट, मनोज रावराणे, रायमन फर्नांडिस, बाबूराव पाटील, ज्ञानेश्वर पाटील, निवृत्ती गावडे, एकनाथ कांबळे, दत्तू मुळीक, शिवाजी तुपारे, तानाजी गडकरी यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते.
संपादन - सचिन चराटी
kolhapur