तरुणीला भाळून सीएची नियत ढळली

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 मे 2020

कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीच्या "सीए'ने कारखान्यात काम करणाऱ्या तरुणीचा विनयभंग केला. किरण कांची असे त्याचे नाव असून, त्याच्याविरोधात संबंधित तरुणीने गोकुळ शिरगाव पोलिसांत फिर्याद दिली आहे.

पट्टणकोडोली  (कोल्हापूर) ः कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीच्या "सीए'ने कारखान्यात काम करणाऱ्या तरुणीचा विनयभंग केला. किरण कांची असे त्याचे नाव असून, त्याच्याविरोधात संबंधित तरुणीने गोकुळ शिरगाव पोलिसांत फिर्याद दिली आहे.

पोलिसांतून मिळालेली माहिती अशी ः संशयित किरण कांची कंपनीत "सीए' आहे. पीडित तरुणी त्याच कंपनीत नोकरीस आहे. कांची याने मंगळवारी (ता. 26) पीडित तरुणीला केबिनमध्ये लज्जा उत्पन्न होईल, असे बोलून तिचा हात पकडला. तसेच, त्याने संबंधित तरुणीला सायंकाळपर्यंत राजीनामा देण्याबाबत धमकावले. यानंतर संबंधित तरुणीने गोकुळ शिरगाव पोलिसांत धाव घेऊन कांचीविरोधात तक्रार दाखल केली. सहायक पोलिस निरीक्षक तिवडे याबाबतचा तपास करीत आहेत.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The fate of the CA fell on the young woman