कोल्हापुरात रेल्वे डब्यातील खत वाहतूक आज ठेवण्यात आली बंद...

Fertilizer transport in railway carriages in Kolhapur was closed today
Fertilizer transport in railway carriages in Kolhapur was closed today

कोल्हापूर - डिझेल दरवाढ न मिळाल्याच्या कारणावरुन‌ लोकल माल धक्का ट्रक मालक चालक वेलफेअर असोसिएशनतर्फे खत वाहतूक आज बंद ठेवण्यात आली. रेल्वेच्या एकवीस डब्यांमधून आलेल्या १३ हजार टन खत वाहतुकीसाठी ठेकेदारांना पर्यायी वाहनांचा आधार घ्यावा लागला. ट्रक चालक मालक यांनी ठेकेदारांविरोधात संताप व्यक्त करत दिवसभर मार्केट यार्डात थांबून राहिले.

रेल्वे डब्यातून येणार्‍या मालाची वाहतूक करण्यासाठी
मालक चालक वेल्फेअर असोसिएशनचे ११० ट्रक  आहेत. ट्रक मालक चालकांनी डिझेल दरवाढ मिळण्याकरिता ठेकेदारांशी पत्रव्यवहार केला होता. पत्राचे ठेकेदारांनी कोणतीही दखल घेतली नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे आज असोसिएशनने खत वाहतूक थांबविण्याचा निर्णय घेतला. १ जूनला डिझेल प्रतिलिटर  ६६ रुपये ५० पैसे होते. आज अखेर डिझेल दरवाढ प्रतिलिटर ८० रुपये २४ रुपये झाले आहे. १४ रुपये प्रतिलिटर झालेली दरवाढ मिळावी, अशी त्यांची मागणी आहे. ती मान्य न झाल्याने आज ट्रक चालक मालकांत असंतोष पसरला. त्यांनी रेल्वे डब्यातील खत वाहतूक थांबविण्याचा निर्णय घेऊन ठेकेदारांविरुद्ध घोषणा दिल्या. त्यामुळे ठेकेदारांना पर्यायी वाहतूकीसाठी एसटी महामंडळाच्या गाड्यांसह अन्य वाहनांचा आधार घ्यावा लागला.

असोसिएशनचे अध्यक्ष विजय कडवेकर, उपाध्यक्ष प्रकाश भोसले, सचिव संजय सावंत, खजिनदार सुभाष आढावकर, विशाल भांडवलकर, झहीर मुजावर, दादासाहेब महेकर, महादेव गायकवाड, बाबासाहेब फराकटे, श्रीरंग पाटील, संदीप हराळे आंदोलनात सहभागी झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com