यंदा भाविकांची सौंदत्ती डोंगराची वारी होणार की चुकणार ? यात्रेसंबंधी ‘वेट ॲन्ड वॉच’

festival of saundatti goddess karnataka for this year decision pending in kolhapur
festival of saundatti goddess karnataka for this year decision pending in kolhapur
Updated on: 

कोल्हापूर :  कोल्हापुरातील भाविकांचे श्रद्धास्थान सौंदत्ती येथील रेणुका देवीची यात्रा यंदा होणार की नाही? याबाबत संभ्रमावस्था आहे. भाविक तसेच रेणुका भक्त संघटना सध्या ‘वेट ॲन्ड वॉच’च्या भूमिकेत आहेत.

सध्या सौंदत्ती येथील मंदिर बंद आहे. ते केव्हा उघडेल हे सांगता येत नाही. त्यातही आजच जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी मंदिर तीस नोव्हेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ते कधी उघडणार, याची उत्सुकता आणखी वाढली आहे. दरवर्षी नोव्हेंबरमध्ये यात्रा भरते. अधिक महिन्यामुळे ती पुढे गेली आहे. ३० डिसेंबरला यात्रेचा मुख्य दिवस असेल.

अनेक वर्षांची परंपरा असलेल्या यात्रेसाठी शहरातून मोठ्या संख्येने भाविक रवाना होतात. प्रासंगिक कराराच्या एसटी गाड्या घेतल्या जातात. गेल्या वर्षी शासनाने खोळंबा आकार कमी केला होता. यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे एसटी बंद राहिली. नंतर सुरू झाली, पण कोरोनामुळे एसटीला अजून प्रवाशांचा फारसा प्रतिसाद नाही. तीन दिवसांच्या सौंदत्ती यात्रेला एसटीतूच जाण्याची परंपरा आहे. सुमारे शंभरावर गाड्यांचे दरवर्षी बुकिंग होते.

यंदा एसटी पसंती देतील का? हाच प्रश्‍न आहे. तसे झाल्यास अनेक वर्षांच्या परंपरा असलेल्या यात्रेला ब्रेक लागू शकतो. यात्रेच्या मुख्य दिवशी जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. तोपर्यंत मंदिर उघडते, की नाही हा ही प्रश्‍न आहे. यात्रेच्या अगोदर आठ दिवस कोल्हापुरातून मानाचे जग रवाना होतात. कोरोनामुळे मंदिरे बंद आहेत. दसऱ्यात देवीला तेल वाहण्यासाठी जाणाऱ्यांची वारी चुकली आहे.

गोकाक तसेच बेळगावमार्गे दरवर्षी भाविक रवाना होतात. बाळेकुंद्री येथे महाराजांचे दर्शन हा ही यात्रेचा भाग आहे. सौंदत्ती डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या कुंडात स्नान केल्यानंतर लिंब नेसण्याचा सोहळा होता. मुख्य दिवशी देवीला नैवैद्य अर्पण केला जातो. या दिवशी कर्नाटकातून येणाऱ्या भाविकांची संख्याही मोठी असते. सायंकाळी पालखी सोहळा झाल्यानंतर भाविक कोल्हारपूरला परत येतात आणि ओढ्यावरील आंबील यात्रा झाल्यानंतर सोहळ्याचा समारोप होतो.  

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Viral Audio Allegations Against Ravikiran Ingawale
Kolhapur District Bank Election 2026 Draft Voter List To Be Published Soon Polling Likely In December
Punyashlok Ahilyadevi loan waiver
Kolhapur Gokul Milk Union Election
Marathi News Esakal
www.esakal.com