शासकीय डॉक्‍टरांचे सांघिक बळाबरच कोरोनाशी लढा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

शासकीय रूग्णालय म्हणजे गैरसोयीचे ठिकाण, अशी टिका काही मोजक्‍यांकडून होते. कोरोना काळात मात्र क्वारंटाईन रूग्णांचा स्वॅब अहवाल पॉझिटीव्ह आला की, त्याला सीपीआर अथवा शासकीय रूग्णालयात दाखल केले जाते. तशी डॉक्‍टरांची धावपळ सुरू होते.

कोल्हापूर : शासकीय रूग्णालय म्हणजे गैरसोयीचे ठिकाण, अशी टिका काही मोजक्‍यांकडून होते. कोरोना काळात मात्र क्वारंटाईन रूग्णांचा स्वॅब अहवाल पॉझिटीव्ह आला की, त्याला सीपीआर अथवा शासकीय रूग्णालयात दाखल केले जाते. तशी डॉक्‍टरांची धावपळ सुरू होते.

प्रत्येक रूग्णांस कोरोनाचे लक्षण एक असले तरी आजारांची, पूर्व इतिहासातील शारिरीक, मानसिक व्याधी विचारात घेऊन उपचाराची दिशा ठरते. एका रूग्णावर एका वेळी कमीत कमी दोन ते सहा डॉक्‍टर्सचे पथक उपचार करतात. यातून जिल्ह्यात जवळपास 716 हून अधिक कोरोनाग्रस्त बरे झाले. यातील 75 हून अधिक गंभीर अवस्थेतील रूग्णांना सांघिक बळावर डॉक्‍टरांनी मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले. 

या यशामुळे शासकीय रूग्ण सेवेची समाजातील प्रतिमा उंचावण्यास मदत होईल, असे म्हणायला हवे. "डॉक्‍टर्स-डे'च्या निमित्ताने या डॉक्‍टरांच्या कामाचे कौतूक होत आहे. जिल्ह्यात 100 हून अधिक डॉक्‍टरांची फौज तीन महिने दिवस रात्र कष्ट घेत आहे. यात सर्वाधिक रूग्ण सीपीआरमध्ये बरे झाले आहेत. कोरोनावर थेट औषध नाही पण लक्षणावर उपचार होतात. पहिल्यांदा जनरल तपासणी एमबीबीएस डॉक्‍टर करतात. पुढे स्वॅब अहवाल पॉझिटीव्ह आला की, हृदय, फुप्फुसाची स्थिती हृदयरोग विभाग तसेच फप्फुस विकार तज्ञांकडून तपासली जाते, तर रूग्णाचे मनोधैर्य वाढविण्याचे काम मानसोपचार तज्ञांकडून केले जाते. काही महिलांना गुंतागुंतीचे आजार असल्यास स्त्री रोग तज्ञांकडून उपचार होतात. विभाग प्रमुख तज्ञ डॉक्‍टरांकडे रूग्णांच्या आरोग्याचे तपशील जातात, त्यावरून अचुक निदान करीत लक्षणानुसार औषधे देत 7 ते 15 दिवसात कोरोना बरा केला जातो. 
राजर्षी शाहू महाराज शासकीय रूग्णालयाच्या अधिष्ठता डॉ. आरती घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सीपीआर रूग्णालयात उपचार होतात. 
एका शिप्टमध्ये 6 ते 8 डॉक्‍टर असतात. एकूण 25 हून अधिक डॉक्‍टर कोरोना उपचार सेवेत आहेत. 

एखाद्या गंभीर गुंतागुंतीच्या रूग्णाला रात्री अपरात्रीही विभाग प्रमुखांच्या सल्ल्यानुसार औषध दिली जातात. गरजेनुसार ऑक्‍सीजन पुरवठा केला जातो. नव्याने प्रयोगही येथे होतात, यात रेमडीसी वीट, टोसीलीज झु मॅप, फ्लॅपेरीवे अशा नवीन औषध संकल्पना वापरल्या जातात. प्लाझ्मा थेरपीही येथे झाली. त्यामुळे रूग्ण बरा करण्यात यश मिळत आहे. 
- डॉ. अनिता सैबन्नावर. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fight against Corona with the help of a team of government doctors