...अन् तलवार, कोयता, चाकू, एडका घेऊन भिडले ११ जण 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 जुलै 2020

जारामपुरी पोलिस ठाण्यात दोन्ही गटांकडून परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले.

कोल्हापूर - शिवाजी उद्यमनगरात दोन गटात सोमवारी रात्री राडा झाला. यात तलवार, कोयता, चाकू, एडकाचा वापर करण्यात आला. हाणामारीत तिघे जण गंभीर जखमी झाले. याप्रकरणी राजारामपुरी पोलिसांत दोन्ही गटाकडून ११ जणांवर परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले. संशयितांची पोलिसांनी धरपकड सुरू केली. 

जखमींची नावे ः गणेश ऊर्फ सागर रमेश पोवार (वय २६, रा. सुभाषनगर), पंकज  रमेश पोवार (वय २७) आणि त्याचा भावसभाऊ रोहीत साळोखे (दोघे रा. माऊलीचा पुतळा परिसर) अशी आहेत. 

शिवाजी उद्यनगरातील एका हॉटेलच्या दारात रात्री दोन गट एकमेकांस भिडले. यात शस्त्राचा वापर दोन्ही गटाकडून केला. यात तिघे तरुण जखमी झाले. हल्ल्याची माहिती मिळताच राजारामपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. 

दरम्यान, याबाबत राजारामपुरी पोलिस ठाण्यात दोन्ही गटांकडून परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले. गणेश ऊर्फ सागर पोवारने दिलेल्या फिर्यादेत चुलत भावाबरोबर झालेल्या पूर्वीच्या भांडणातून रात्री संशयित पंकज रमेश पोवार, गेंड्या ऊर्फ ऋषिकेश चौगुले (वय २२), साईराज दीपक जाधव (वय ३०), रोहित बजरंग साळुंखे (वय १९), नितीन ऊर्फ बॉब दीपक गडीयल (वय २०, सर्व रा. राजारामपुरी परिसर) यांनी तलवार व एडक्‍याने मारहाण केली आणि दौलतनगरातील मित्र नीलेश कांबळेचे घर पेटविण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले आहे. जखमी पंकज पोवारने दिलेल्या फिर्यादेत पूर्वीच्या भांडणातून संशयित रवी शिंदे, अमित बामणे, गणेश पोवार, नीलेश बामणे, सनी साळे, नीलेश कांबळे व त्यांच्या साथीदारांनी कोयता, चाकू व काठ्यांनी मारहाण केल्याचे म्हटले आहे. 

हे पण वाचा -  ब्रेकिंग ; रूग्णालयातून पळ काढलेल्या त्या कोरोना रूग्णाचा मृत्यू

 

 

संशयितांची धरपकड...
दोन गटात झालेल्या या हाणामारीची गंभीर दखल पोलिसांनी घेतली. यानंतर त्यांनी संशयितांची धरपकड सुरू केली. रात्री उशिरापर्यंत दोन्ही गटातील १० जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी सुरू असून त्यांच्यावर अटकेची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक नवनाथ घोगरे यांनी सांगितले.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fight between two groups in kolhapur