आय लिगमध्ये उद्यापासून पाच फुटबॉल संघात जुगलबंदी

Fighting Five Football Teams In The I-League From Tomorrow Kolhapur Marathi News
Fighting Five Football Teams In The I-League From Tomorrow Kolhapur Marathi News

गडहिंग्लज : कोलकत्यात उद्यापासून (ता. 8) सुरू होणाऱ्या इंडियन फुटबॉल लिग (आय लिग) पात्रता स्पर्धेकडे देशातील फुटबॉल वर्तुळाचे लक्ष लागले आहे. या स्पर्धेत कोलकत्याचे मोहामेडन स्पोर्टिंग, भवानीपूर एफसी, अहमदाबादचा अरा एफसी, दिल्लीचा गहेरवाल एफसी, बंगलुरचा एफसी बंगलुरू युनायटेड या पाच संघात जुगलबंदी रंगणार आहे. यंदा भारतीय फुटबॉलमधील दिग्गज संघ म्हणुन आळखले जाणारे कोलकत्याचे मोहन बागान, ईस्ट बंगाल हे इडियन सुपर लिग (आयएसएल) स्पर्धेत उतरणार आहेत. त्यामुळेच या स्पर्धेतुन आय लिग प्रथम श्रेणीसाठी पारंपारिक कोलकत्याचा की? नवा संघ गवसणार? याची फुटबॉलक्षेत्राला उत्कंठा लागली आहे. 

आयएसएल स्पर्धेमुळे आयलिग स्पर्धेला दुय्यम स्थान मिळत असल्याची सध्या संघांची भावना आहे. त्यातच आयलिग स्पर्धेतील कोलकत्याचे दोन्हीं यशस्वी संघ बाहेर पडल्याने आय लिगची क्रेझ कमी झाल्याची चर्चा सुरू आहे. सहभागी संघाचा गटातील कामगिरीचा आढावा घेतल्यास कोलकत्याचा 129 वर्षांचा गौरवशाली इतिहास असणारा "ब्लॅक पॅन्थर' 
स्पोर्टिंग "फेवरिट' मानला जातो. मुळचे पुण्याचे सध्या एरा संघाचे प्रशिक्षक विवेक नागुल यांनी इतिहास घडविण्याची संधी समजुन रणशिंग फुंकले आहे. "ब्रिंग बॅक बंगलुरू' म्हणत युनायटेड एफसीनेही शड्डू ठोकला आहे. 

मोहामेडन स्पोर्टिंग देशातील सर्वात जुना क्‍लब, प्रथम श्रेणी आय लिगचा अनुभव, पंजाब एफसीचे माजी प्रशिक्षक यान ला यांच्याकडेसुत्रे आहेत. त्रिनिदादचा विलिस प्लाझा, नेपाळचा अभिषेक रिजेल, नायजेरियाचा जॅन चिडे यांच्यावर मदार आहे. भवानीपूर एफसीचा भरवसा आफ्रिकन अंशुमन क्रोमह, फिलीप अडेजा यांच्यासह शिल्टन पाल या खेळाडूंवर आहे. अहमदाबादचा अरा एफसीचा परदेशी कॅमरा, इजेह स्टॅनली यांच्यावर भिस्त आहे. प्रशिक्षक डेव्हीड हूड यांच्या युनायटेडने बंगलुरूच्या लिगमध्ये उपविजेतेपद पटकाविले. सहायक प्रशिक्षक गौरमागींसिंग यांच्यामदतीने युवा खेळाडूंची मोट बांधली आहे. गटसाखळीत आयएसएलच्या राखीव संघाचा अनपेक्षितपने मात करून वर्चस्व गाजविणाऱ्या गहरवाल एफसीची खरी कसोटी लागणार आहे. 

स्पर्धेचे वेळापत्रक 
- 8 आक्‍टोंबर भवानीपूर एफसी वि. एफसी बंगलुरू युनायटेड दु. 12.30 वा. 
मोहामेडन स्पोर्टिंग वि. गहेरवाल एफसी सायंकाळी 4.30 वा. 
- 11 आक्‍टोंबर मोहामेडन स्पोर्टिंग वि. एरा एफसी दु. 12.30 वा. 
गहेरवाल एफसी वि. एफसी बंगलुरु युनायटेड सायंकाळी 4.30 वा. 
- 14 आक्‍टोंबर गहेरवाल एफसी वि. भवानीपूर एफसी दु. 12.30 वा 
एफसी बंगलुरु युनायटेड वि. एरा एफसी सायंकाळी 4.30 वा. 
- 16 आक्‍टोंबर एरा एफसी वि. गहेरवाल एफसी दु. 12.30 वा. 
भवानीपूर एफसी वि. मोहामेडन स्पोर्टिंग सायंकाळी 4.30 वा. 
- 19 आक्‍टोंबर एफसी बंगलुरू युनायटेड वि. मोहामेडन स्पोर्टिंग दु. 12.30 वा. 
एरा एफसी वि. भवानीपूर एफसी सायंकाळी 4.30 वा. 

संपादन - सचिन चराटी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com