दहावीची परीक्षा रद्द करावी यासाठी जनहित याचिका दाखल...

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 21 May 2020

कर्नाटक शिक्षण खात्याने 25 जुन ते 4 जुलै दरम्यान दहावी परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र वकील लोकेश कुमार यांनी न्यायालयात जनहित याचिका दाखल केली.

बेळगाव - शिक्षण खात्याने दहावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करीत परीक्षेची तयारी सुरू केली आहे. मात्र दहावी परीक्षा रद्द करावी अशी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षण खात्याची पुन्हा डोखेदुखी वाढली आहे.

कर्नाटक शिक्षण खात्याने 25 जुन ते 4 जुलै दरम्यान दहावी परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र वकील लोकेश कुमार यांनी न्यायालयात जनहित याचिका दाखल केली असुन राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे परीक्षा काळात मुलांनाही त्याचा संसर्ग होण्याचा धोका आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत परीक्षा घेणे योग्य नाही त्यामुळे परीक्षा रद्द करावी तसेच सर्व विद्यार्थ्यांना पास करावे अशी मागणी त्यांनी याचिकेद्वारे केली आहे.

वाचा - ऑलिम्पिक विजेता जपानचा 'हा' खेळाडू बनला फूड डिलिव्हरी बॉय...

लोकेशकुमार यांनी दाखल केलेल्या याचिकेवर 27 रोजी सुनावणी होणार आहे यावेळी न्यायालय कोणते मत व्यक्त करेल याकडे शिक्षण खात्याचे लक्ष लागून राहिले आहे.
27 मार्चपासून सुरू होणारी दहावीची परीक्षा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लांबणीवर पडली आहे. तसेच विद्यार्थ्यांवरील दडपण वाढत असल्याने शिक्षण मंत्री एस सुरेशकुमार यांनी परीक्षा लवकर घेण्यासाठी सर्व ती काळजी घेतली जाईल असे स्पष्ट करीत 25 जुनपासून परीक्षा घेण्याची घोषणा केली होती त्यानंतर मंगळवारी दहावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र परिक्षेबाबत न्यायालयात याचिका दाखल झाल्याने परीक्षा पुन्हा लांबणीवर पडू नयेत अशीच अपेक्षा विद्यार्थी व पालकांमधून व्यक्त होत आहे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Filed a public interest petition to cancel the ssc examination in karnatka