esakal | बारा वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर अखेर अरुण लाड झाले आमदार: कुंडलगावात दिवाळी
sakal

बोलून बातमी शोधा

finally MLA of NCP leader Arun Lad sangli

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अरुण लाड यांचे आमदार होण्याचे स्वप्न आज साकार झाले

बारा वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर अखेर अरुण लाड झाले आमदार: कुंडलगावात दिवाळी

sakal_logo
By
अजित झळके

सांगली : प्रदीर्घ प्रयत्नानंतर अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अरुण लाड यांचे आमदार होण्याचे स्वप्न आज साकार झाले.  पुणे पदवीधर मतदारसंघातून श्री लाड यांनी 48 हजाराहून अधिक मताधिक्क्याने विजय मिळवला,  त्याच्या आनंदात कुंडल परिसरासह पलूस तालुक्यात रात्रीपासूनच अक्षरशः दिवाळी साजरी करण्यात आली. क्रांतीकारकांचा भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पट्ट्यात गुलालाचा अक्षरशा पाऊस पडतोय.


 पुणे पदवीधर मतदार संघातून अरुण लाड यांनी विजय मिळवल्याचे आज पहाटे जाहीर करण्यात आले. कुंडल मध्ये मात्र काल रात्रीपासूनच जल्लोष साजरा करण्यास सुरुवात झाली होती अरुण लांडे यांनी दहा हजाराचे मतादेख्य घेतल्याची बातमी सायंकाळी सातच्या सुमारास कुंडल परिसरात धडकली आणि तेथूनच पलूस तालुक्यासह सर्वत्र फटाके फुटायला सुरुवात झाली. 

 रात्रभर जागून कार्यकर्त्यांनी लीड वाढेल तशी फटाक्यांची मोठी माळ फोडायला सुरुवात केली,  पुणे पदवीधर हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो या बालेकिल्ल्याला सुरुंग लावत गेल्या बारा वर्षांपासून पदवीधरांची बांधणी करणाऱ्या लाड यांनी दणदणीत आणि एकतर्फी विजय साजरा केला.  त्याचा आनंद राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाभर साजरा करत अक्षरशः दिवाळी साजरी केली. 

हेही वाचा- महाराष्ट्र केसरीचा शड्डू घुमणार प्रेक्षकांविना ; शासनाच्या परवानगीकडे मल्लांच्या नजरा -


 सांगली शहरात राष्ट्रवादी कार्यालयासमोर फटाके फोडून कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.  सोशल मीडियावर ही कार्यकर्ते सकाळपासूनच अतिशय आक्रमकपणे सक्रिय झाले असून लाड यांच्या विजयाचा आनंद उत्सव साजरा केला जात आहे.  भाजपसाठी एकतर्फी मानली जाणारी ही निवडणूक राष्ट्रवादीने उलटवली आणि राष्ट्रवादीसाठी ती एकतर्फी झाली त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये आणि नेत्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे.

 संपादन- अर्चना बनगे

go to top