
राशिवडे बुद्रुक (कोल्हापूर) - सीपीआर मध्ये परिचारिकांना कपडे बदलायला घ्यावा लागतो ब्लॅकेट्स चा आधार. या 'सकाळ' मधून प्रसिद्ध झालेल्या वृत्तामुळे येथील युवकांचे मन हेलावले आणि त्यांनी गावातील घराघरातून ६६ हजार रुपयांचा निधी संकलीत केला यापैकी 25000 सीपीआर आणि पंचवीस हजार मुख्यमंत्री सहाय्यता निधीला आज सुपूर्द केला.
येथील नागेश्वर व्यापारी असोसिएशन आणि ग्रामस्थांनी यासाठी धडपड घेतली. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच कोल्हापूर जिल्ह्यातील रुग्णांवर उपचार करणारे सीपीआर मधील डॉक्टर, कर्मचारी, आणि परिचारिका यांची व्यथा चार दिवसापूर्वी 'सकाळ'मध्ये मांडण्यात आली होती. विशेष करून परिचारिकांना कपडे बदलण्यासाठी असलेल्या केबिनच्या दरवाजावर चक्क ब्लँकेट टाकून आडोसा करावा लागत आहे. ही बातमी प्रसिद्ध झाली. त्याची अनेकांनी दखल घेतली.
कार्यकर्त्यांनी आपल्याला सीपीआरसाठी काहीतरी करायलाच हवं असा निर्धार केला आणि आपल्यासह गावातील अनेकांकडून निधीसाठी आवाहन केले. चार दिवसात बघता बघता 66 हजार रुपये जमा झाले. त्यातील 16000 गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सेवा सुविधांसाठी दिले.पंचवीस हजार रुपये सीपीआरमध्ये कर्मचाऱ्यांनी आणि परिचारिकांच्या सुविधांसाठी दिले तर कोरोनाला लढा देणाऱ्या महाराष्ट्र शासनाला खारीचा वाटा म्हणून पंचवीस हजार देण्यात येतील. हा निधी आज सिपीआर प्रमुख डॉ. मिनाक्षी गजभिये यांच्याकडे सुपूर्द केला. निधी संकलन करून तो देण्यासाठी येथील युवक निवास डकरे, प्रकाश धुंदरे डॉ. प्रकाश पोवार, गजानन कापसे, संजय शिंदे, मारुती पाटील, संतोष लाड, आनंदा शिंदे, अनिल रणदिवे विशाल सुतार, राहुल कापसे, नितीन बिल्ले चंद्रकांत लाड यांनी सहभाग नोंदवला. या कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन गावातील आणि त्यांनी फूल ना फुलाची पाकळी म्हणून मदत केली.
सीपीआर मधील डॉक्टर, कर्मचारी आणि परिचारिका या कोरोणाच्या विरोधात लढत असल्याची दखल घेऊन येथील सुविधा वाढवण्यासाठी राशिवडे येथील ग्रामस्थांनी दिलेली मदत मोलाची आहे. अशा मानसिक पाठबळाची गरज आहे. असे मत सिपीआर अधिष्ठात्या डॉ. मीनाक्षी गजभिये यांनी आभार पत्रातून व्यक्त केले आहे.
'सकाळ' मधील बातमी वाचून आमच्या मनाला खूप वेदना झाल्या. कार्यकर्त्यांनी मिळून सीपीआर साठी मदत देण्याचा निर्णय घेतला आणि ग्रामस्थांनी पाठबळ दिले. फार मोठी मदत नसली तरी भावना आणि लोक प्रतिसाद हा मोठा आहे.
निवास डकरे व डॉ. प्रकाश पोवार - कार्यकर्ते राशिवडे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.