कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होणार सर्वपक्षीयांचे धरणे आंदोलन का ते जाणून घ्या...

निवास चौगले
Monday, 10 August 2020

दरमहा 300 युनिटसच्या आत वीज वापर असणाऱ्या राज्यातील सर्व गरीब व सर्वसामान्य घरगुती वीज ग्राहकांची गेल्या एप्रिल मे जून या ती महिन्यातील वीज देयके माफ करणेत यावीत यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन

कोल्हापूर ः दरमहा 300 युनिटसच्या आत वीज वापर असणाऱ्या राज्यातील सर्व गरीब व सर्वसामान्य घरगुती वीज ग्राहकांची गेल्या एप्रिल मे जून या ती महिन्यातील वीज देयके माफ करणेत यावीत यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशन, स्वाभिमानी शेतकरी संघटना, महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना व कोल्हापूर जिल्हा व शहर सर्वपक्षीय कृति समिती यांच्यासह सर्व संघटना, सर्वपक्षीय यांच्यावतीने प्रा.डॉ. एन डी पाटील यांच्या नेतृत्वाखाली उद्या (ता. 10) सकाळी दहा वाजता कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन जाहीर करण्यात येणार आहे. 
कोल्हापूर प्रमाणेच संपूर्ण राज्यात सर्व जिल्ह्यांतील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी आपापल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर याच वेळी धरणे आंदोलन करण्याचे आवाहन प्रा. डॉ. पाटील यांच्यासह माजी खासदार राजू शेट्टी, प्रताप होगाडे, आर. के. पवार आदिंनी केले आहे. या मागणीसाठी पहिल्यादां 13 जुलै रोजी राज्यस्तरीय वीज बिल होळी आंदोलन जाहीर करण्यात आले होते. या आंदोलनानंतर राज्य सरकारने घरगुती वीज ग्राहकांना वीज बिलांमध्ये 20 ते 30 टक्के दिलेली सवलत ग्राहकांना मान्य व दिलासा देणारी नाही, तर उलट आजच्या कोरोना सद्यस्थितीत त्यांच्या अडचणींवर आणि दुःखावर मीठ चोळणारी आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारने संपूर्ण वीज बिल माफी करावी, अशी वीज ग्राहकांची रास्त अपेक्षा आहे. त्यासाठी हे आंदोलन होत असून त्यात लोकांनी सहभागी व्हावे असे आवाहन फेडरेशनच्यावतीने करण्यात आले आहे. 

संपादन यशवंत केसरकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Find out why there will be a protest of all parties in front of Kolhapur District Collector's Office ...