esakal | कोल्हापूर : इचलकरंजीत सायझिंगच्या आगीत बगॅस साठ्यासह जळावू लाकूड खाक; 12 लाखाच्या नुकसानीचा अंदाज

बोलून बातमी शोधा

fire in sayzing bagyas and wood damages in fire rupees 10 lakh in kolhapur

नागरिकांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे वेळीच आग आटोक्यात आल्यामुळे मोठी वित्तीय हानी ठळली.

कोल्हापूर : इचलकरंजीत सायझिंगच्या आगीत बगॅस साठ्यासह जळावू लाकूड खाक; 12 लाखाच्या नुकसानीचा अंदाज
sakal_logo
By
पंडित कोंडेकर

इचलकरंजी (कोल्हापूर) : येथील गणेशनगरमधील समाधान सायझिंग येथे लागलेल्या आगीत बगॅस साठा व जळावू लाकूड भस्मसात झाले. इचलकरंजी पालिकेच्या अग्निशामक दलाने पाण्याचा मारा केला. तसेच नागरिकांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे वेळीच आग आटोक्यात आल्यामुळे मोठी वित्तीय हानी ठळली. या आगीत सुमारे १० ते १२ लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज असून आगीचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. 

हेही वाचा - ईडीच्या पथकाचा गोवा हद्दीत छापा; बड्या उद्योगपतीच्या फार्महाऊसची झाडाझडती

येथील गणेशनगरमधील सहाव्या गल्लीत शिवाजी धोंडपुडे यांचे समाधान सायझिंग आहे. यासाठी इंधन म्हणून लागणारे लाकूड व बगॅस साठा ठेवण्यात आला होता. सकाळी याठिकाणी अचानक आग लागली. पाहता पाहता आग पसरत गेली. इचलकरंजी पालिकेच्या तसेच पंचगंगा साखर कारखान्याचे अग्निशामक दल तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. सुमारे तासाभराच्या प्रयत्नाने आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. पण यामध्ये बगॅस व लाकूडसाठा मोठ्या  प्रमाणात जळाला. लगतच सायझिंग उद्योग आहे. सुदैवाने या उद्योगाला मात्र आगीची मोठी झळ पोहचली नाही. आग विझविण्यासाठी नागरीकांचीही मोठी मदत मिळाली.