esakal | राजस्थानातील गुंडाच्या टोळीसोबत कोल्हापुरात पोलिसांची चकमक; एक गुंड गंभीर जखमी
sakal

बोलून बातमी शोधा

Firing between police and gangster in kolhapur

पुणे- बंगळुरू महामार्गावरील किणी टोलनाक्‍यावर पोलिस आणि गुंडांमध्ये चकमक झाली. या चकमकीत एक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती पुढे येत आहे. चार गुंडांच्या टोळीसोबत ही चकमक झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

राजस्थानातील गुंडाच्या टोळीसोबत कोल्हापुरात पोलिसांची चकमक; एक गुंड गंभीर जखमी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - पुणे- बंगळुरू महामार्गावरील किणी टोलनाक्‍यावर पोलिस आणि गुंडांमध्ये चकमक झाली. या चकमकीत एक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती पुढे येत आहे. चार गुंडांच्या टोळीसोबत ही चकमक झाल्याची प्राथमिक माहिती आहे. 

हे पण वाचा - आता कोल्हापुरात या ठिकाणी मिळणार शिवभोजन थाळी 

याबाबत अधिक माहिती अशी, मंगळवारी रात्री आठच्या सुमारास पोलिस आणि गुंडांच्या टोळीमध्ये चकमक झाली. यात टोळीतील एकजण गंभीर जखमी झाला आहे, तर एक पोलिस कर्मचारीही जखमी झाला आहे. शामलाल (वय 25) आणि श्रावणकुमार अशी जखमी गुंडांची नावे आहेत. यातील शामलाल हा टोळीचा प्रमुख आहे. 

चकमक झालेली टोळी राजस्थानमधील असून या टोळीवर तेथे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. 

दरम्यान, या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्यासह पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. बघ्यांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली असून या घटनेने महामार्गवरी वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. पोलिसांच्या सहकार्याने ही वाहतूक सुरळीत करण्यात आली.