आधी कार्यकर्त्याची शिकार, मग दुसरे सावज शोधतात 

First the hunt for the worker, then the second hunt
First the hunt for the worker, then the second hunt
Updated on

कोल्हापूर : राजू शेट्टी एका कार्यकर्त्याची शिकार करतात. मग दुसरे सावज शोधतात. उल्हास पाटील, शिवाजीराव माने, नितीन पाटील ही उदाहरणे आहेत. आत्ताही सावकर मादनाईक, प्रा. जालंदर पाटील यांच्यासारख्या अभ्यासू कार्यकर्त्यांना आमदारकी न देता स्वतःच घेतली. संघटनेचा चिरेबंदी वाडा कमकुवत होऊ लागला आहे. बुरूज ढासळत आहे. हे पाहून वेदना होतात, अशी टीका माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी शेट्टी यांच्यावर केली. जनसंवाद यात्रेनिमित्त श्री. खोत कोल्हापुरात आले होते, यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. 

खोत म्हणाले, ""राजू शेट्टी यांनी 18 वर्षे संघटनेतील विविध पदांवर काम केले. खासदार म्हणूनही कार्यकर्त्यांनी लोकसभेत पाठवले. आता सावकर मादनाईक आणि प्रा. जालंदर पाटील यांच्यासारख्या अभ्यासू कार्यकर्त्यांना विधान परिषदेमध्ये पाठवणे आवश्‍यक होते. मात्र, आताही स्वतःच आमदारकी घेतली. शेट्टी यांचा स्वभाव वेगळा आहे. प्रत्येकवेळी ते एका कार्यकर्त्याची शिकार करतात. उल्हास पाटील, शिवाजीरान माने, नितीन पाटील यांची शिकार त्यांनी केली. आता ते नवीन सावज शोधत आहेत. ते एका पक्षाशी निष्ठा ठेवू शकत नाहीत. सत्तेच्या जवळ जाण्यासाठी जो पक्ष उपयुक्त असतो, तिकडे ते जातात. शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या पोरांनी वाढवली. हा चिरेबंदी वाडा कमकुवत होतो आहे. बुरूज ढासळत आहे, हे पाहून वेदना होतात.'' 

राष्ट्रवादीची दादागिरी मोडून काढू 
आमदार गोपीचंद पडळकर यांची पाठराखण करताना खोत म्हणाले, ""पडळकरांचे विधान चुकीचे आहे; पण राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आतापर्यंत काय केले? चंद्रकांत पाटील यांना टोपण नावे देतात. त्यांची जात काढतात. उसाच्या आंदोलनावेळी शेट्टी यांची जात कोणी काढली? शाहूंनी पुण्याची पगडी घातली म्हणून कोणी टीका केली? याचे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आत्मचिंतन करावे. त्यांची दादागिरी मोडून काढू. पडळकर फकीर आहे. त्याचे कपडे फाडले तरी ते दुसऱ्यांनी दिलेले आहेत. तुम्ही मात्र चिरेबंदी वाड्यात राहणारे नेते आहात, याचे भान राखा.'' 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com