पीक कर्ज वाटपात कोल्हापूर राज्यात प्रथम 

First in Kolhapur State in crop loan disbursement
First in Kolhapur State in crop loan disbursement

कोल्हापूर : पिककर्ज वाटपामध्ये कोल्हापूर जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. वार्षिक 2 हजार 480 कोटी रुपये वाटपाचे उद्देष्ट असताना फेब्रुवारीअखेर 2 हजार 584 कोटी रुपये वाटप झाले असून त्याची 104 टक्के उद्दिष्टयपूर्ती झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिली. कर्जवाटपामध्ये अग्रेसर राहिल्याबद्दल श्री देसाई यांनी सर्वच बॅंकांचे कौतुक केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हास्तरीय सल्लागार समिती व जिल्हास्तरीय आढावा समितीची बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. 


श्री देसाई म्हणाले, पंतप्रधान स्वनिधी योजना तसेच विविध महामंडळांचे प्रलंबित प्रस्ताव तात्काळ मार्गी लावले पाहिजेत. बॅंकांनी सीडी रेशो वाढवणे गरजेचे आहे. महामंडळांकडील तसेच पंतप्रधान स्वनिधी योजनाबाबतचे प्रस्ताव ज्या बॅंकांकडे प्रलंबित आहेत, अशा बॅंक प्रतिनिधींसोबत महामंडळाच्या व्यवस्थापकांची बैठक घ्यावी. इचलकरंजी, जयसिंगपूरवर लक्ष केंद्रीत करावे. बॅंकांनी आपला सीडी रेशोही वाढवावा. पीक कर्जात ज्या पध्दतीने काम झालेले आहे, तशाच पध्दतीने बॅंकांनी महामंडळांबाबत संवेदनशील राहून जास्तीत-जास्त प्रस्ताव मार्गी लावावेत. 

अग्रणी जिल्हा व्यवस्थापक राहूल माने म्हणाले, जिल्ह्यामध्ये 31 डिसेंबर 2020 पर्यंत पंतप्रधान जनधन योजनेंतर्गत 11 लाख 41 हजार 378 नवीन खाती सुरु केली आहेत. तर, 9 लाख 99 हजार 356 खात्यामध्ये रूपे कार्ड दिली आहेत. प्रधानमंत्री जीवनसुरक्षा विमा योनजनेंतर्गत 4 लाख 95 हजार 741 तर, प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजनेतर्गत 1 लाख 88 हजार 869 खाती सुरु केली आहेत. अटल विमा योजनेंतर्गत 60 हजार 847 खाती व प्रधानमंत्री मुद्रा योजनेंतर्गत डिसेंबर 2020 अखेर 78 हजार 849 लाभार्थ्यांना 528.41 कोटी अर्थसहाय्य दिले आहे. प्राथमिकता प्राप्त सेवा क्षेत्राकरिता 9 हजार 320 कोटींचा आराखडा केला आहे. 31 डिसेंबर 2020 अखेर जिल्ह्याच्या एकुण उद्दिष्टापैकी 6 हजार 351 कोटी (68 टक्के) इतकी उद्दिष्ट्यपूर्ती झाली आहे. डिसेंबरअखेर 30 हजार 642 कोटी ठेवी आहेत. एकुण 24 हजार 201 कोटी कर्जाची शिल्लक असल्याचे श्री माने यांनी सांगितले. 

यावेळी, जिल्हा परिषदेच मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, विभागीय व्यवस्थापक शिवकुमार, आरसेटीच्या जिल्हा समन्वयक सोनाली माने उपस्थित होते. रिझर्व्ह बॅंकेचे सहाय्यक महाप्रबंधक मनोज मून, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक नंदू नाईक उपस्थित होते. 

संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com