गडहिंग्लजला 133 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच महिलेकडे मुकादम पद

First Time In Gadhinglaj A Woman Has Been Selected Sanitizer Officer Kolhapur Marathi News
First Time In Gadhinglaj A Woman Has Been Selected Sanitizer Officer Kolhapur Marathi News
Updated on

गडहिंग्लज : स्वच्छतेच्या कामावर नियंत्रण ठेवण्यासाठी अस्तित्वात असणाऱ्या मुकादम पदावर आतापर्यंत पुरुषांचा वरचष्मा राहिला आहे; परंतु या परंपरेला छेद देत येथील पालिकेने लाखे समाजातील रेखा डावाळे यांच्या माध्यमातून एका महिलेकडे या पदाची सूत्रे सोपवण्याचा घेतलेला निर्णय 133 वर्षांच्या इतिहासात महत्त्वपूर्ण मानला जात आहे. 
सफाई कामगारांकडून स्वच्छतेचे काम करून घेण्याची जबाबदारी मुकादमाकडे असते.

शहरात स्वच्छतेच्या सोयीसाठी पाच प्रभाग तयार केले असून प्रत्येक प्रभागातील सहा ते आठ सफाई कामगारांमागे एक मुकादम असतो. पालिकेकडे तीन पदे मंजूर आहेत. यातील भैरू खोत निवृत्त झाल्याने त्यांच्या जागेवर मुकादम नियुक्तीची प्रक्रिया प्रशासनाने पार पाडली. सेवा ज्येष्ठतेनुसार रेखा डावाळे यांचे नाव पुढे आले. आतापर्यंत या पदावर पुरुष कर्मचाऱ्यांची नेमणूक होत होती. 133 वर्षांच्या इतिहासात प्रथमच रेखा डावाळे यांच्या माध्यमातून महिलेला संधी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय पालिकेने घेतला आहे. डावाळे यापूर्वी सफाई कामगार म्हणून कार्यरत होत्या. लाखे समाजातील सफाई कामगारांची संख्या अधिक आहे. याच समाजातील एका महिलेला ही संधी मिळाल्याने आनंद व्यक्त होत आहे. 

दरम्यान, डावाळे यांच्या या नेमणुकीबद्दल नगरसेवक महेश कोरी यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला. डावाळे यांना मिळालेले हे पद त्यांनी आतापर्यंत केलेल्या प्रामाणिक कार्याची पोहच पावती असल्याचे मत कोरी यांनी व्यक्त केले. या वेळी लाखे समाजाचे जिल्हाध्यक्ष विनोद लाखे, ईश्‍वर सोनटक्के, रामा लाखे, संदीप पाटील, इम्रान मुल्ला, पप्पू सलवादे, जाफर तपकीरे आदी उपस्थित होते. 

kolhapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com