esakal | पहिल्या बुधवारी "नो व्हेईकल डे', मुरगूड नगरपालिका सभेत ठराव

बोलून बातमी शोधा

On the first Wednesday "No Vehicle Day", a resolution was passed at the Murgud Municipal Council

मुरगूड  : माझी वसुधंरा मोहीमेंतर्गत पर्यावरण बचाव व प्रदूषण टाळण्यासाठी शहरात प्रत्येक महिन्याच्या पहिल्या बुधवारी' नो व्हेईकल डे ' पाळण्याचा एकमुखी ठराव आज नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत केला. नगराध्यक्ष राजेखान जमादार अध्यक्षस्थानी होते. 

पहिल्या बुधवारी "नो व्हेईकल डे', मुरगूड नगरपालिका सभेत ठराव
sakal_logo
By
प्रकाश तिराळे

मुरगूड - कोल्हापूर  : माझी वसुधंरा मोहीमेंतर्गत पर्यावरण बचाव व प्रदूषण टाळण्यासाठी शहरात प्रत्येक महिन्याच्या पहिल्या बुधवारी' नो व्हेईकल डे ' पाळण्याचा एकमुखी ठराव आज नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत केला. नगराध्यक्ष राजेखान जमादार अध्यक्षस्थानी होते. 
नगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या सभेत विविध विषयावर चर्चा झाली. 
नगरसेवक जयसिंग भोसले यांनी मुरगूड - निपाणी मार्गावरील प्रवेशद्वारावर हाय मास्ट दिवे व कमानीच्या मागणीला प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला. वेदगंगा नदी शेजारील दत्त मंदीरा जवळील स्मशानभूमीचे काम बंद असून हे काम निकृष्ट झाल्याची तक्रार नगरसेविका वर्षाराणी मेंडके यांनी केली. भटक्‍या कुत्र्याचा बंदोबस्त करण्याचा प्रश्न नगरसेवक नामदेवराव मेंडके यांनी उपस्थित केला. त्यावर लवकर उपाय योजना करण्याचा आग्रह धरला. 
महालक्ष्मीनगरात घंटागाडीची घंटा बंद झाल्याने पालिकेच्या कोणत्याच सूचना मिळत नसल्याच्या तेथील महिलांच्या तक्रारी आहेत. तसेच या उपनगरातील बगीचा सर्वासाठी खुला करावा.अशी मागणी नगरसेविका सुप्रिया भाट यांनी केली.सभेत 2021 - 22 या आर्थिक वर्षांची चतुर्थ वार्षिक कर आकारणी करणे,तिमाही लेख्यांना मंजुरी देणे आदिसह सर्व विषय मंजूर करण्यात आले. 
संदीप कलकुटकी, जयसिंग भोसले, मारुती कांबळे, विरोधी पक्षनेता राहूल वंडकर, नगरसेविका सुप्रिया भाट आदींनी चर्चेत सहभाग घेतला. प्रशासनातर्फे मुख्याधिकारी संजय गायकवाड, अभियंता प्रकाश पोतदार, दिलीप कांबळे, जयवंत गोधडे यांनी प्रश्नांना उत्तरे दिली. विषयपत्रिका वाचन स्मिता पाटील यांनी केले. 

सुधारीत पाणी योजनेनंतरच ड्राय डे 
सुधारीत नळपाणी योजना सुरु होईपर्यंत ड्राय डे न पाळण्याचा निर्णय सभेत झाला. सुधारीत पाणी योजना कधी पूर्ण होणार ? व शहरातील रस्त्याचे डांबरीकरण पावसाळ्यापूर्वी होणार का ? याची माहिती सभागृहाला देण्याची मागणी नगरसेवक सुहास खराडे यांनी केली. त्यावेळी या योजनेची सद्यस्थिती मांडण्यात आली. 

संपादन ः यशवंत केसरकर