esakal | कोल्हापूर: दरोड्याच्या तयारीतील पाच जण जेरबंद ; पिस्तूल, जीवंत राऊंड, तलवारीसह मोटार जप्त 

बोलून बातमी शोधा

Five arrested in preparation for robbery kolhapur}

गावठी पिस्तूलासह चार जीवंत काडतूसे असलेले मॅगझीन, तलवार, अलिशान मोटारीसह सुमारे आठ लाखांचा मुद्देमाल जप्त केला

कोल्हापूर: दरोड्याच्या तयारीतील पाच जण जेरबंद ; पिस्तूल, जीवंत राऊंड, तलवारीसह मोटार जप्त 
sakal_logo
By
राजेश मोरे

कोल्हापूर - बंगला हेरून दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या पाच जणांच्या टोळीला राजारामपुरी पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून गावठी पिस्तूलासह चार जीवंत काडतूसे असलेले मॅगझीन, तलवार, अलिशान मोटारीसह सुमारे आठ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. सायबर चौकात रात्री घडलेल्या या थरारनाट्यात एक पोलिस कर्मचारीही जखमी झाला. 

अजिंक्‍य मनोहर भोपळे (वय 28, रा. वाशी नवी मुंबई, मूळ रा. चोकाक, हातकणंगले), जयवंत सर्जेराव सावळे (वय 36), दीपक जनार्दन आडगळे (वय 30, दोघे रा. रा. कोपर्डी, हवेली, कराड), अनिल आनंदा वायदंडे (वय 49, रा. बनवडी ता. कराड), वैभव दादासाहेब हजारे (वय 26, बनवडे फाटा, ता. कराड) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. 

 
नियोजनबद्ध व थरारक कारवाई... 
राजारामपुरी पोलिस ठाण्याचे कर्मचारी महेश पोवार यांना मंगळवारी (ता. 2) एक टोळी मोटारीतून दरोडा टाकण्यासाठी शहरात येणार असून त्यांच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती मिळाली. त्यांनी याची माहिती उपनिरीक्षक समाधान घुगे यांना दिली. त्याच रात्री महेश पोवार यांना ही मोटार इंदिरासागर चौकातून हॉकी स्टेडियम मार्गे सायबर चौकाकडे येणार असल्याची माहिती मिळाली. तिचा शोध घेण्यासाठी ते पोवार व सुरेश काळे हे मोटारसायकलवरून या मार्गावर गस्त घालत होते. सायबर चौकात उपनिरीक्षक घुगे व त्यांच्या पथकाने सापळा लावून ठेवला होता. रिंगरोडवर संबधित मोटार पोवार व काळे यांच्या निदर्शनास आली. त्यांनी तिला सायबर चौकात गाठले. तेवढ्यात येथील घुगे त्यांचे सहकाऱ्यांनी झडप घालून मोटारीतील पाच जणाना ताब्यात घेतले. त्यावेळी झालेल्या झटापटीत पोलिस कर्मचारी महेश पोवार हे जखमी झाले. 

प्राथमिक चौकशीत संशयितांनी त्याची नावे अजिंक्‍य भोपळे, जयवंत साळवे, दीपक आडगळे, अनिल वायंदडे, वैभव हजारे असल्याची सांगितले. त्याच्याकडून गावठी मॅगझीनसह पिस्तूल, चार जीवंत राऊंड, दोन तलवारी, दोरी, दोन बॅटऱ्या, मोबाईल, सहा हजार 400 रूपयाचीं रोकडसह आलीशान मोटार असा 7 लाख 94 हजार 500 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. संशयित कळंबा मध्यवर्ती कारागृहातून बाहेर पडलेल्या एका मित्राला भेटून आले होते. त्याचा जवाहनगरातील मोठ्या बंगल्यात दरोडा टाकण्याचा प्रयत्न होता. अशी माहिती तपासात पुढे आली. ही कारवाई उपनिरीक्षक समाधान घुगे, कर्मचारी महेश पोवार, सुरेश काळे, भूषण ठाणेकर, उत्तम माने, युक्ती ठोंबरे, सचिन देसाई व सुशांत तळप यांनी केली. असल्याचे शहर पोलिस उप-अधीक्षक मंगेश चव्हाण व पोलिस निरीक्षक सिताराम डुबल यांनी सांगितले. 
 
 संपादन - धनाजी सुर्वे