
चंदगड : शहरातील विविध विकासकामे मार्गी लावण्यासाठी पाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करावा, अशी मागणी नगरसेवक दिलीप चंदगडकर यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. फडणवीस कोल्हापूर दौऱ्यावर आले असता चंदगडकर, नगरसेवक सचिन नेसरीकर, नगरसेविका प्रमिला गावडे, रंजना कोकरेकर यांच्यासह भाजपच्या चंदगड तालुका महिला अध्यक्षा समृध्दी काणेकर, उद्योजक सुनील काणेकर यांनी त्यांची भेट घेऊन निवेदन दिले.
चंदगड हे तालुक्याचे ठिकाण आहे. परंतु रस्त्याची अवस्था दयनीय आहे. पंचायत समिती, तहसिल कार्यालय, न्यायालय आदी प्रमुख कार्यालयांकडे जाणारे रस्ते उखडले आहेत. गटर व्यवस्थित नसल्याने सांडपाण्याचा निचरा होत नाही. शहरात महिलांसाठी शौचालय नाही. ही सर्व कामे मार्गी लावण्यासाठी निधी उपलब्ध करावा, अशी मागणी केली आहे.
तालुक्यात मल्टी स्पेशालीटी हॉस्पीटलची गरज आहे. या भागातील रुग्णांना आरोग्य सेवेसाठी बेळगाव, गडहिंग्लज, कोल्हापूर यासारख्या शहरावर अवलंबून रहावे लागते. पैसा आणि वेळेचा अपव्यय होतो. आरोग्य सेवा उपलब्ध नाही म्हणून अनेक रुग्णांना जीव गमवावा लागतो. शहरात केवळ एकच सरकारी बॅंक आहे. त्यामुळे कामाचा ताण आहे. दिवसदिवसभर बॅंकेच्या बाहेर ग्राहकांच्या रांगा लागलेल्या असतात. त्यासाठी शहरात आणखी सरकारी बॅंकेच्या शाखा सुरू कराव्या, अशीही मागणी निवेदनातून केली आहे.
संपादन - सचिन चराटी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.