टाकाऊ केसांपासून अंबाडे ;  अर्थाजनाला दिला हातभार

टाकाऊ केसांपासून अंबाडे ;  अर्थाजनाला दिला हातभार

कोल्हापूर : घरात आपण सहज विंचरतो आणि घरात कचरा नको म्हणून केस फेकून देतो. असा टाकाऊ असलेला केसांचा कचरा संकलित करून पूजा दळवी यांनी कौटुंबिक अर्थाजनाला हातभार लावला आहे. लॉकडाउनमध्ये सर्वजण घरी असल्याने मुबलक वेळ त्यांना मिळाला. छंदातून विविध तयार केशरचना यूट्यूबच्या माध्यमातून करण्यास शिकल्या. टाकलेल्या केसाची वेणी गुंफून महिलांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसे अंबाडे बनविले. या अंबाड्याला फुलांनी, गजऱ्यांनी रंगरूपात सजवले, नटवले. आणि एक अंबाडा 300 रुपयांच्या पटीत विक्री होऊ लागले आणि घरखर्चाला आर्थिक हातभारही लावला. 
पूजा यांचे शिक्षण बी.एसस्सी (आयटी) मध्ये झाले आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी शिवाजी विद्यापीठात परीक्षा विभागात काही काळ नोकरीही केली. त्यांचे पती महेश दळवी हे त्यांना प्रोत्साहन देत होते. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी शासनाने लॉकडाउन जाहीर केला. सर्वचजण घरी अडकले. मिळालेल्या वेळाचा सदुपयोग कसा करायचा, असा विचार त्या करत होत्या. त्यांचे लहान बाळ असल्याने तितकासा परिणाम त्यांना जाणवला नाही, तरीही व्यक्तिमत्त्वाला आकार देणारी एखादी गोष्ट शिकावी, असे त्यांना वाटू लागले. यातच त्यांना महिलांचे आकर्षण असलेले अंबाडे तयार करावेत, अशी कल्पना सुचली. लॉकडाउन काळात हे अंबाडे शिकवणारे कोणी नव्हते. यूट्यूबच्या माध्यमातून टाकलेल्या केसांपासून सुंदर असे अंबाडे कसे तयार करायचे, याचे प्रशिक्षणच घेतले. यातून त्यांनी ते तयार करण्याचा प्रयत्नही केला. तो यशस्वी झाल्यानंतर त्यात वैविध्य आणत अंबाड्याचे जवळपास पंधरा ते वीस प्रकार केले. त्याला मागणीही वाढली. थोडासा वेळ, कल्पकता आणि बुद्धिचातुर्याचा वापर करत लघुउद्योजिका म्हणून स्वतःला नावारूपास आणले आहे. 


कल्पकतेतून उद्योजिकेला वाव 
आर्टिफिशियल फ्लॉवर ज्वेलरीचा सध्या ट्रेंड आहे. मार्केटमधील हा ट्रेंड ओळखून ही ज्वेलरी अगदी कमी काळात शिकल्या. सध्या कोणत्याही हळदी, डोहाळे जेवण अशा समारंभात लागणाऱ्या या ज्वेलरी ग्राहकांना हव्या तशा करून देतात. कमी वेळात त्यांच्यातील कल्पकतेतून उद्योजिकेला वाव मिळाला. 

लॉकडाउनमध्ये सर्वचजण घरी होते. त्यामुळे लहान बाळाला सांभाळताना भरपूर वेळ मिळत होता. याच वेळात आर्टिफिशयल ज्वेलरी कशी तयार करायची, हे यूट्यूबवरून शिकले. घरच्यांनीही सहकार्य केले. सध्या या ज्वेलरीला मागणी वाढती आहे. घर, बाळाला सांभाळत हे काम करताना आनंद वाटतो. 
-पूजा दळवी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com