हैदराबादहून कोल्हापुरात आले विमान, 61 दिवसांनंतर सेवा सुरू

हैदराबादहून कोल्हापुरात आले विमान, 61 दिवसांनंतर  सेवा सुरू

उजळाईवाडी ः कोल्हापूरची विमानसेवा 61 दिवसांनंतर आजपासून मर्यादित स्वरूपात सुरू झाली. नियोजित इंडिगो व अलाइंस एअरपैकी फक्त अलाइंसचे विमान आज कोल्हापूर विमानतळावर दोन वाजून 45 मिनिटांनी उतरले. यावेळी हैदराबादवरून आलेल्या या विमानातून 14 प्रवासी आले होते. त्यापैकी तीन प्रवासी रत्नागिरी येथील असल्यामुळे त्यांना प्रशासनाच्या वतीने रत्नागिरी जिल्ह्याच्या हद्दीपर्यंत सोडले आहे, तर कोल्हापूरहून हैदराबादला 18 प्रवासी घेऊन विमानाने टेक ऑफ केले. दरम्यान, एका प्रवाशाच्या शरीराचे तपमान जास्त असल्याने त्यास परवानगी दिली नाही. 
विमानातून आलेल्या सर्व प्रवाशांना डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये तपासण्यासाठी केएमटीने पाठवले. त्या सर्व प्रवाशांना 14 दिवस क्वारंटाईन करण्यात येणार आहे. यासाठी त्यांच्या इच्छेनुसार खासगी अथवा शासकीय विलगीकरण कक्षात राहता येईल. 

दरम्यान उद्या (ता. 26) अलाइंस एअर कंपनीचे विमान अडीच ते तीनच्या सुमारास येणार असून, इंडिगो एअरलाइन्सची विमान सेवा सुरळीतपणे सुरू होण्यास दोन-तीन दिवसांचा अवधी लागणार आहे. विमान प्रवास करण्यासाठी आलेल्या सर्व प्रवाशांना कोरोना संरक्षण किट देण्यात येत होते. त्याचबरोबर विमान प्रवाशांच्या सर्वसामान्यांचे निर्जंतुकीकरण सोशल डिस्टन्स इनसाठी आसन व्यवस्था व जमिनीवरती विशिष्ट चिन्हाने चिन्हांकन केले होते. सामानाची विमानतळ कर्मचाऱ्यांकडून कॉन्टॅक्‍टलेस तपासणी करण्यात येत होती. तसेच तिकीट तपासणी व बोर्डिंग पाससुद्धा कॉंटॅक्‍टलेस प्रक्रियेद्वारे देण्यात येत होता. 
एअर होस्टेस यांनी पीपी किट घालून आपली सेवा बजावत होत्या. 
जिल्हा प्रशासनाच्या वतीने करवीरच्या तहसीलदार शीतल मुळे-भांबरे, गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण, विमानतळ प्राधिकरणाचे संचालक कमलकुमार कटारिया व विमानतळ सुरक्षा विभागप्रमुख अशोक इंदुलकर उपस्थित होते. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com