"छत्रपती घराण्यावरील टिका सहन केली जाणार नाही"

सकाळ वृत्तसेवा
Monday, 12 October 2020

संवेदनशील परिस्थीतीत संभाजीराजे यांच्यावर केलेली टिका अतिशय निंदणीय व निषेधार्थ आहे. 

म्हाकवे (कोल्हापूर) : छत्रपती घराण्याचा वारसा लाभलेल्या खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यावरील 
टिका कदापिही सहन करणार नाही. संभाजीराजेच्यावर बोलणाऱ्य़ा गुणरत्न सदावर्ते यांचा जाहिर निषेध करत असल्याचे मत शिवसेनेचे माजी आमदार श्री.संजयबाबा घाटगे यांनी व्यक्त केले. मराठा आरक्षणाच्या चर्चेदरम्यान गुणरत्ने यांनी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यावर केलेल्या टिकेचे पडसाद उमटत असताना श्री.घाटगे यांनी व्हनाळी येथे पत्रकार परिषद घेऊन जाहिर निषेध व्यक्त केला.

श्री.घाटगे म्हणाले, "खासदार संभाजीराजे सर्वच जाती धर्माला, समाजाला विश्वासात घेऊन कार्यरत आहेत. कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावण्याची हमी देत मराठा आरक्षणाचा मुद्दा ते पुढे नेत आहेत.अशा संवेदनशील परिस्थीतीत संभाजीराजे यांच्यावर केलेली टिका अतिशय निंदणीय व निषेधार्थ आहे. उच्चभ्रु मराठा समाजाला आज आरक्षण नको आहे. मात्र दारिद्रयाच्या खाईत खितपत पडलेल्या उपेक्षीत मराठा समाजाला न्याय मिळवून देणेसाठी खासदार संभाजीराजे सर्वानांच विश्वासात घेत आहेत. आपले सर्व वैभव, मोठेपणा, राजेपणा सोडुन सर्वांसाठी लढा देत आहेत. त्यांच्या या लढ्याला प्रोत्साहन देता आले नाही तरी चालेल पण त्यांची निंदा करु नये. अशी विनंती घाटगे यांनी केली. छत्रपती घराणे हे आमचे तसेच महाराष्ट्राची अस्मिता, दैवत आहे. त्यामुळे येथून पुढे छत्रपती घराण्यावर टिका खपवून घेणार नाही."

हेही वाचा- कोव्हॅक्‍सीन लशीची मानवी चाचणी महिनाअखेरला

या पत्रकार परिषदेस संजय धनराज घाटगे,धनाजी गोधडे, ए. वाय.पाटील म्हाकवेकर, काकासाहेब सावडकर, आनंदा तळेकर , धोंडीराम एकशिंगे, राजू भराडे, एम. बी. पाटील, तानाजी पाटील, संतोष ढवन, के. बी वाडकर, एम. टी. पोवार उपस्थित होते.

 संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Former MLA of Shiv Sena Shri Sanjay Baba Ghatge kagal whanali press conference