सावधान : फॅशन म्हणून किल्ला भटकंतीस येताय......

 Fortresses Drunk For Punishment Kolhapur Marathi News
Fortresses Drunk For Punishment Kolhapur Marathi News

कोल्हापूर : महाराष्ट्र सार्वजनिक दारूबंदी कायद्याच्या कडक अंबलबजावणीतून गड किल्ल्यांवर दारू पिऊन दंगा गोंधळ घालणाऱ्यांना वचक बसेल, अशा प्रतिक्रिया इतिहास विषयक कार्य करणाऱ्या संघटनांच्या प्रतिनिधींकडून व्यक्त झाल्या.
कायद्यांतर्गत सहा महिने सश्रम कारावास आणि दहा हजार रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे. दुसऱ्यांदा तोच गुन्हेगार सापडला तर त्याला एक वर्षाचा सश्रम कारावास होईल. 

कायद्याचा धाक महत्वाचा

किल्ला भटकंतीस जितका अवघड त्या किल्ल्यावर पूर्वी केवळ इतिहास अभ्यासक, संशोधक लोक जात होते. ही स्थिती आता बदलली आहे. केवळ मौजमजेसाठी आडवाटेवरच्या किल्ल्यांवर जाण्याचे प्रमाण वाढले आहे. मांसाहार जेवण करणे, दारू पिणे असे नको ते प्रकार तेथे घडत आहेत. मद्यपींना रोखण्यासाठी इतिहास विषयक संघटना जरूर आहेत. मात्र मद्यपींना रोखताना त्यांच्यात वादाचे प्रसंग घडत आहेत. या कायद्यामुळे मद्यपींना अटकाव तर बसेलच, शिवाय कायद्याचा धाकही कळेल.
- भगवान चिले (दुर्ग अभ्यासक)

गड भटकंतीचे फॅशन

गड भटकंतीचे फॅशन आले आहे. इतिहास विषयक संघटनांनी गड स्वच्छता करायची आणि मद्यपींनी बाटल्या व प्लास्टिकच्या कचऱ्याने गड घाण करायचा, असे चित्र 
सर्वत्र दिसत आहे. आज कोणत्याही गडावर गेल्यावर बाटल्या व प्लास्टिकचा कचरा दिसतोच. तो किती वेळा साफ करायचा, असा प्रश्न कार्यकर्त्यांना सतावत असतो. या कायद्यामुळे मद्यपींवर वचक बसल्याशिवाय राहणार नाही.
- प्रमोद पाटील (अध्यक्ष, हिल रायडर्स)

पोलिसांना माहिती द्या...
महाराष्ट्रातील गडकोट आपली संपत्ती आहे. शिवछत्रपतींच्या पराक्रमाचे ते मूक साक्षीदार आहेत. त्यांच्या संवर्धनाचे कार्य सुरू असताना अतिउत्साही कार्यकर्ते व व मद्यपींकडून गालबोट लावण्याचे काम सुरू आहे. त्यांच्यावर कायद्याचा बडगा उगारण्यात आवश्‍यक होते. त्यांना मद्य पिण्यापासून रोखताना वादाचे प्रसंग घडले आहेत. या कायद्यामुळे मद्यपींना गडावर दारू पिण्याचे धाडस होणार नाही. इतिहास विषय कार्य करणाऱ्या संघटनांनीही अशा मद्यपींवर  नजर ठेवून त्याची पोलिसांना माहिती द्यायला हवी.
- हेमंत साळोखे (अध्यक्ष, सह्याद्री प्रतिष्ठान)

गडकोटांचे संवर्धन गरजेचे

कारवाईचा बडगा उगारल्याखेरीज मद्यपींवर लगाम बसणे शक्‍य नव्हते. गडकोट भटकंती करणारे आमच्यासारखे कार्यकर्ते सातत्याने गड स्वच्छतेचा ध्यास घेऊन काम करतात. भावी पिढ्यांना आपल्या पूर्वजांचा इतिहास करायचा असेल तर गडकोटांचे संवर्धन झाले पाहिजे. गडांवरील वास्तूवर कोणीही नाव लिहिता कामा नये, ही आमची भूमिका आहे. या कायद्यामुळे गडकोटांचे नुकसान करणारे यापुढे गडकोटांवर धिंगाणा घालणे नक्कीच थांबवतील.
- नितीन देवेकर (अध्यक्ष, गडकोट गिर्यारोहक संघटना)1

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com