कोगे येथे भोगावती नदीमध्ये चारचाकी कोसळली....

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 मे 2020

करवीर पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी यांचे वडील गुंडोपंत सूर्यवंशी हे या चारचाकी वाहनात होते.

कोल्हापूर - कोगे ता.करवीर येथील पुलावरून भोगावती नदीमध्ये चारचाकी कोसळली. करवीर पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी यांचे वडील गुंडोपंत सूर्यवंशी हे या चारचाकी वाहनात होते. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी भोगावती नदीवर असणाऱ्या या पुलाजवळ एकच गर्दी केली.सकाळी साडे अकराच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान सव्वा एक वाजता ही चारचाकी वाहन नदीतून बाहेर काढण्यात स्थानिक ग्रामस्थांना यश आले.तेथून त्यांना कोल्हापुरला तातडीने सीपीआर रुग्णालयात हालवण्यात आले.

वाचा - विपरीतच घडलं ! तिने सायरनचा आवाज ऐकला अन् तिच्या जिवाच झालं वाईटच...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: four wheeler fell into the Bhogawati river senior citizen died