
आजरा : चाळोबा जंगलात वस्तीला असलेल्या टस्कर हत्तीने एकाच शेतातील उसाचे पिक फस्त करीत आहे. संबंधीत शेतकऱ्यांचे सुमारे पंचवीस गुंठे ऊस पिकाचे नुकसान झाले आहे. टस्कर एकाच शेतकऱ्याच्या शेतात येवून गेली पंधरा दिवस सलग नुकसान करीत असल्याने वनविभाग अचंबित झाला आहे याबाबतचे कोणालाही कोडे उलगडेनासे झाले आहे.
माद्याळ (ता. आजरा) येथील हनमंत शेळके व शिवाजी शेळके या दोन शेळके बंधुचे शेतातील उसाचे पिक गेले पंधरा दिवस टस्कर फस्त करीत आहे. त्याला हुसकावण्यासाठी वनविभागाचे पथक कार्यरत आहे. पण त्यांनाही टस्कर बधेनासा झाला आहे. त्यांना शेळकेंच्या शेतात ठाण मांडले असून पंधरा दिवसात सुमारे पंचवीस गुंठे क्षेत्रातील पिक खावून व तूडवून उध्वस्त केले आहे. टस्कराच्या उपद्रवाने शेळके बंधू हवालदिल झाले आहेत. संबंधीत शेतकऱ्यांचे बाजारभावाप्रमाणे सुमारे सत्तर हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
टस्कर या परिसरात आल्यावर अन्य कोणत्याही शेतकऱ्यांच्या ऊस पिकात जात नाही. थेट शेळके यांच्या शेतात उतरून तो ऊस पिक फस्त करतो. गेली पंधरा दिवस त्याचे या शेतात ठाण आहे. त्याला नक्की काय झाले आहे याचे कोडे वनविभागालाही उलगडेनासे झाले आहे. दोन महिन्यांपुर्वी गवसे येथील शेतकऱ्यांचे सलग दहा ते पंधरा दिवस टस्कराने नुकसान केले होते. त्यानंतर परत असा प्रकार माद्याळ येथे पहावयास मिळाल्याचे आजरा परिक्षेत्राचे वनाधिकारी बी. डी. काटकर यांनी सांगितले.
ऊस उचलण्याची मागणी
टस्कराने पिकामध्ये मोठा धुमाकूळ घातल्याने हत्ती प्रवणक्षेत्रातील उसाची उचल साखर कारखान्यांनी करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. वेळेत ऊस उचल न केल्यास टस्कराकडून तो फस्त होणार असल्याची भिती शेतकरी व्यक्त करीत आहेत.
संपादन - सचिन चराटी
kolhapur
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.