भविष्यात रेल्वे अंतराळी धावू शकते, डॉ. परशराम शिरगे यांचा सहा नव्या अतिसुवाहकाचा शोध

नंदिनी नरेवाडी- पाटोळे
Thursday, 21 January 2021

कोल्हापूर ः पाचशे किलोमीटरचे अंतर फक्त एका तासात कापणारी बुलेट ट्रेन ज्या अतिसुवाहक पदार्थांच्या आधारे धावते, तसेच अतिसुवाहक पदार्थांच्या आधारे ऊर्जा निर्मिती, ऊर्जा वहन आणि वैद्यकीय क्षेत्रातील एमआरआयच्या माध्यमातून कर्करोग आणि ट्युमरचे निदान केले जाते, अशा अतिसुवाहक पदार्थांच्या संशोधनात कोल्हापूरच्या डॉ. परशराम शिरगे यांनी योगदान दिले आहे. जपानमधील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऍडव्हान्स इंडस्ट्रियल सायन्स ऍण्ड टेक्‍नॉलॉजी आणि दक्षिण कोरियातील इलेक्‍ट्रो टेक्‍नॉलॉजी रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये संशोधनाद्वारे सहा नव्या अतिसुवाहकाचा शोध लावला आहे. 

येणाऱ्या काळात त्यांच्या अतिसुवाहकाच्या शोधामुळे जमिनीवरून जाणाऱ्या जलद अशा रेल्वे अतिसुवाहक आणि प्रतिचुंबकियच्या वापरातून मॅग्नेटिक लेवियेटेड ट्रेन जमिनीवरून न जाता आकाशातून (अंतराळी) प्रवास करू शकणार आहेत. जपानमध्ये टोकियोत हा प्रयोग यशस्वीही झालेला आहे. भारतात जर शासनाने पुढाकार घेतला तर या शोधामुळे मुंबई ते दिल्ली अंतर दोन तासांमध्ये ट्रेनने कापले जाऊ शकते. 
डॉ. परशराम शिरगे मुळचे चंदगड तालुक्‍यातील कामेवडीचे. त्यांनी गडहिंग्लज येथील शिवराज कॉलेजमधून पदवीचे शिक्षण घेतले. शिवाजी विद्यापीठातून एमएसस्सी भौतिकशास्त्र विषयातून पूर्ण केल्यानंतर दक्षिण कोरिया येथील इलेक्‍ट्रो टेक्‍नॉलॉजी रिसर्च इन्स्टिट्युटमध्ये शास्त्रज्ञ म्हणून त्यांच्या करिअरची सुरवात झाली. दक्षिण कोरियामध्ये त्यांनी इलेक्‍ट्रोडिपॉझिट कॉम्प्लेक्‍स थेलियम वर आधारित तंत्र विकसित केले. संशोधनामध्ये इलेक्‍ट्रोकेमिकल, थिन फिल्म ग्रोथ, युटिलायझेशन ऑफ हाय प्रेशर टू सिंथेसेस नोवेल मटेरियल्स, नोवेल सुपर कंडक्‍टर सर्च, आयस्टोकोप इफेक्‍टस्‌, पॉंईट कॉंन्टॅक्‍ट स्प्रेक्‍ट्रोस्कोपी, मायक्रोव्हेव स्टडी, सोलर सेलमधील नॅनो मटेरियल्स स्टोरेज, बायो सेन्सर आणि गॅस सेन्सिंग आदी विषयांचा समावेश आहे. 

आयआयटीत विभागप्रमुख 
डॉ. परशराम शिरगे इंदूर येथील इंडियन इन्स्टिट्युट ऑफ टेक्‍नॉलॉजी (आयआयटी) मध्ये धातू प्रायोगिकी व पदार्थ विज्ञान विभागाचे विभागप्रमुख म्हणून कार्य केले आहे. टाटा इन्स्टिट्युट ऑफ फंडामेंटल रिसर्च संस्थेत त्यांनी काही काळ अभ्यागत व्याख्याते म्हणूनही काम केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली 13 विद्यार्थ्यांनी पी. एच डी संपादन केली आहे. तर सध्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली 7 विद्यार्थी पी. एचडी करत आहेत. त्यांनी दोनशेहुन अधिक शोधनिंबध सादर केले आहेत.

संपादन - यशवंत केसरकर

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In the future the railways may run intermittently, Drs. Parasram Shirge's discovery of six new super-conductors