गडहिंग्लजला उपोषणकर्त्यांना रुग्णालयात हलविले

In Gadhinglaj Moved The Protesters To The Hospital Kolhapur Marathi News
In Gadhinglaj Moved The Protesters To The Hospital Kolhapur Marathi News
Updated on

गडहिंग्लज : अप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याच्या निवृत्त कामगारांचे (गोडसाखर) थकीत देणी मिळविण्यासाठी महिनाभरापासून धरणे आंदोलन सुरू आहे. गुरुवारपासून (ता.11) त्यांनी बेमुदत उपोषण सुरु केले आहे. मात्र, त्याकडे फारसे गांभीर्याने न पाहणाऱ्या प्रशासनाने आज आंदोलनाची दखल घेतली. चार उपोषणकर्त्यांना रुग्णालयात हलविले. दरम्यान, निवृत्त कामगारांनी उद्या (ता.15) गडहिंग्लज बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन केले आहे. 

गोडसाखरच्या निवृत्त कामगारांचे 17 कोटी रुपये थकीत देणी आहेत. त्यासाठी 14 जानेवारीपासून प्रांत कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू आहे. आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी अर्धनग्न मोर्चा काढला, भीक मागो आंदोलनचाही मार्ग पत्करला. पण, थकीत देणी देण्याबाबत बैठकांच्या पलिकडे काहीच हालचाली झालेल्या नाहीत. त्यामुळे निवृत्त कामगारांनी गुरुवारपासून (ता.11) आमरण उपोषणाचे हत्यार उपसले. शिवाजी पाटील (हरळी बुद्रूक), आप्पासाहेब कांबळे (कडगाव), विठ्ठल चुडाई (निलजी), हणमंत चौगुले (नूल) हे चार जण उपोषणाला बसले आहेत. 

दरम्यान, सकाळी साडेअकराच्या सुमारास तहसीलदार दिनेश पारगे, पोलिस निरीक्षक प्रकाश गायकवाड आंदोलनस्थळी भेट दिली. त्यांनी निवृत्त कामगारांचे नेते शिवाजी खोत यांच्याशी चर्चा केली. आंदोलकांची परिस्थिती पाहता त्यांना रुग्णालयात हलविणे गरजेचे असल्याचे सांगितले. श्री. खोत यांनी प्रशासनाने आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. उपोषणकर्त्यांना घेऊन गेलात तरी आंदोलन सुरुच राहिल असे स्पष्ट केले. प्रशासनाने चारही उपोषणकर्त्यांना रुग्णवाहिकेतून येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविले. 

दरम्यान, निवृत्त कामगारांतर्फे उद्या (ता.15) गडहिंग्लज बंदची हाक देण्यात आली आहे. व्यवसाय बंद ठेवून निवृत्त कामगारांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा द्यावा, अशी विनंती व्यापारी असोसिएशनला केली आहे. त्याबाबतचे पत्र देण्यात आले आहे. पत्रावर शिवाजी खोत, सुभाष पाटील, चंद्रकांत बंदी, रणजीत देसाई यांच्या सह्या आहेत. 

सर्व श्रमिक संघाचा पाठिंबा 
निवृत्त कामगारांच्या आंदोलनाला सर्व श्रमिक संघाने पाठिंबा दिला आहे. महासंघाचे अतुल दिघे, दत्तात्रय अत्याळकर, बॅंक एम्प्लॉईज युनियनच्या सुवर्णा तळेकर, छाया तिप्पट, इंजिनिअरिंग कामगारांचे प्रकाश कांबरे, पेन्शनर्सचे अनंत कुलकर्णी, गिरणी कामगारांचे अमृत कोकितकर, रामजी देसाई, गोपाळ गावडे, शेतमजूर परिषदेचे सुनील माळी, बांधकाम व यंत्रमागचे धोंडिबा कुंभार यांच्यातर्फे पत्र दिले आहे. 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com