गडहिंग्लज पालिका ठरली 5 कोटींची मानकरी, देशात मिळविला 13 क्रमांक... वाचा सविस्तर बातमी... 

Gadhinglaj Municipality Is 13th In The Country Kolhapur Marathi News
Gadhinglaj Municipality Is 13th In The Country Kolhapur Marathi News
Updated on

गडहिंग्लज : केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण-2020 अभियानात गडहिंग्लज पालिकेने 13 व्या स्थानी झेप घेऊन पाच कोटींच्या पारितोषिकाची मानकरी ठरली. वेस्ट झोनमधील सहा राज्यांमध्ये पालिकेने सहावा क्रमांक पटकावला. स्वच्छ, सुंदर व हिरवे गडहिंग्लज शहर संकल्पनेला आणखीन बळ मिळाले आहे. 

केंद्र शासनाने तीन वर्षापासून देशभरातील महापालिका, नगरपालिका क्षेत्रासाठी स्वच्छ सर्व्हेक्षण अभियान सुरू केले. या अभियानात गडहिंग्लज पालिकेने सहभाग घेवून सुरूवातीपासूनच मोठ्या उत्साहाने काम सुरू केले. अभियानातंर्गत नागरिकांच्या वैयक्तिकसह सार्वजनिक स्वच्छता चांगली ठेवण्यासाठी प्रयत्न केले. प्रभागनिहाय स्वच्छतेचे मेळावे घेवून नागरिकांना प्रबोधन केले. ओला व सुका कचरा वर्गीकरण करून ओल्या कचऱ्यातून गांडूळ निर्मिती आणि सुक्‍या कचऱ्याद्वारे कंपोष्ट खत तयार केले. हागणदारीमुक्त शहर ठेवण्यात यश मिळविले आहे. घर आणि बागेतील कचऱ्यापासून खतनिर्मिती करण्याचे धडे नागरिकांना दिले. या खताचा वापर घराजवळच्या बागेलाच वापरण्याचा फायदा यातून झाला. भिंती रंगवून त्याद्वारे स्वच्छतेचे प्रबोधन केले. 

मोहिमेत मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर यांच्या नेतृत्वाखालील प्रशासनाला नगराध्यक्षा स्वाती कोरी, उपनगराध्यक्ष शकुंतला हातरोटे, नगरसेवकांनी साथ दिली. विशेषत: शहरवासीयांचा सहभाग उल्लेखनिय ठरला. विशेष करून या यशाला आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या कष्टाची किनारही लाभली आहे. 

मानांकनात प्रगती 
गतवर्षीच्या स्वच्छ सर्व्हेक्षण अभियानात एक लाख लोकसंख्येच्या आतील गडहिंग्लज पालिका 27 व्या क्रमांकावर होती. यंदा देशातील 3898 शहरांमधून 13 व्या क्रमांकावर झेप घेतली. याशिवाय देशपातळीवरील विभागीय झोन (सहा राज्यातून) यंदा पालिकेने सहावे स्थान पटकावत गडहिंग्लज शहर स्वच्छतेचा झेंडा देशाच्या नकाशात फडकवला आहे. 

प्रत्येक घटकांच्या योगदानातून यश 
नागरिकांच्या सहभागातून मिळालेले हे यश आहे. कर्मचारी आणि विशेषत: आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांचे कौतुक करावे तितके कमी आहे. नगरसेवक, मुख्याधिकाऱ्यांचे सहकार्यही मोलाचे ठरले. नागरिकांसह पालिकेतील प्रत्येक घटकांच्या योगदानातून मिळालेल्या या यशाबद्दल सर्वांचे अभिनंदन. 
- स्वाती कोरी, नगराध्यक्षा 


संपादन - सचिन चराटी 

Kolhapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com