esakal | गडहिंग्लज आठवडा बाजारातील अर्धा कोटीची उलाढाल ठप्प

बोलून बातमी शोधा

Gadhinglaj Weekly Market Turnover Of Half A Crore Stalled Kolhapur Kolhapur Marathi News

राज्य शासनाने जाहीर केलेल्या वीक एन्डं लॉकडाउनमुळे येथील आठवडा बाजार आज भरला नाही. सीमाभागातील मोठा आठवडा बाजार बंद राहिल्याने लाखों रुपयांची उलाढाल ठप्प राहिली.

गडहिंग्लज आठवडा बाजारातील अर्धा कोटीची उलाढाल ठप्प
sakal_logo
By
दीपक कुपन्नावर

गडहिंग्लज : राज्य शासनाने जाहीर केलेल्या वीक एन्डं लॉकडाउनमुळे येथील आठवडा बाजार आज भरला नाही. सीमाभागातील मोठा आठवडा बाजार बंद राहिल्याने लाखों रुपयांची उलाढाल ठप्प राहिली. बाजार समितीत भरणाऱ्या जनावरांच्या बाजारातही शुकशुकाट पहायला मिळाला. तीस एप्रिलपर्यंत दर आठवड्याला हा लॉकडाउन असल्याने या महिन्यात आठवडा बाजार भरणार नसल्याचे पालिका प्रशासनाने जाहीर केले आहे. पणन मंडळाने व्यवहाराला परवानगी दिली असली तरी सुरक्षिततेच्या दृष्टीने जनावरांचा बाजारही बाजार समितीने बंद ठेवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. 

आजरा, चंदगड, गडहिंग्लज तालुक्‍यासह लगतच्या सीमाभागातील मोठा बाजार म्हणून येथील बाजार ओळखला जातो. भाजीपाल्यासह कडधान्ये, तांदुळ, प्लास्टीक साहित्य, फळासह जनावरांचा मोठा बाजार भरतो. सुमारे दोन हजारांहून अधिक विक्रेते याठिकाणी येतात. दिवसभरात लाखों रुपयांची उलाढाल होते. या उपविभागासह कागल, भुदरगड तालुक्‍यातूनही ग्राहक खरेदीसाठी येतात. 

गतवर्षी मार्चच्या सुरवातीला कोरोनाचा संर्सग वाढू नये म्हणून आठवडा बाजार बंद केला. तब्बल 32 आठवडे हा बाजार बंद राहिला. नोंव्हेंबर महिन्यापासून पुन्हा प्रशासनाने परवाणगी दिल्यावर हा बाजार भरू लागला. कोरोनाचा संर्सग वाढू लागल्याने राज्यशासनाने 1 ते 30 एप्रिल अखेर दर शनिवारी आणि रविवारी विक एन्डं लॉकडाउन केला आहे. कालपासून (ता. 10) त्याची अंमलबजावणी सुरु झाली. यामुळे आज आठवडा बाजार भरला नाही. नगरपालिकेने याबाबतची सुचना देणारे फलक शहरातील मुख्य ठिकाणी लावले आहेत. बाजार समितीने जनावरांचा बाजार बंद ठेवणार असे जाहीर केल्याने नेहमी म्हैशी, शेळ्या-मेंढ्या, बैलांनी गजबजणाऱ्या आवारात शुकशुकाट होता. 

भाजीपाला सौदे नाहीत 
भाजीपाला हा नाशंवत असल्याने पणन मंडळाने सौद्यांना बाजार समितीत लॉकडाऊनमध्येही परवाणगी दिली आहे. सध्याची संचारबंदी त्यात खरेदी करुन भाजीपाला विकायचा तरी कोठे हा विक्रेत्यांचा प्रश्‍न होता. साहजिकच, बाजार समितीत शेतकरी आणि ग्राहकच न फिरकल्याने सौदे झाले नाहीत. 

संपादन - सचिन चराटी

kolhapur