गडहिंग्लजला पहिल्या टप्प्यात मिळणार 2619 जणांना लस

Gadhinglaj Will Get 2619 People Vaccinated In The First Phase Kolhapur Marathi News
Gadhinglaj Will Get 2619 People Vaccinated In The First Phase Kolhapur Marathi News
Updated on

गडहिंग्लज : येणार...येणार...म्हणत अखेर कोरोना प्रतिबंधक लस जिल्ह्यात दाखल झाली आहे. कोल्हापुरात त्याची चाचणीही सुरू करण्यात आली आहे. गडहिंग्लज तालुक्‍यात पहिल्या टप्प्यामध्ये वैद्यकीय क्षेत्रातील 2619 जणांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात येणार आहे. आरोग्य विभागातर्फे त्याची पूर्वतयारी झाली असून जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात हे लसीकरण होण्याची शक्‍यता आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. व्ही. अथणी व उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. डी. एस. आंबोळे यांनी दिली. 

यावर्षी मार्च महिन्यापासून कोरोना राज्यात दाखल झाला. त्यानंतर हळूहळू त्याचा संसर्ग खेड्यापर्यंत आला. तालुक्‍यातील पॉझीटीव्ह व लक्षणे असणाऱ्यांसाठी शेंद्री माळावर कोविड काळजी केंद्र आणि उपजिल्हा रूग्णालयात समर्पित कोविड हॉस्पीटल सुरू झाले. याठिकाणी आतापर्यंत 11 हजार 820 जणांचे स्वॅब घेतले. त्यापैकी 10 हजार 82 जण निगेटीव्ह तर, 1642 जण पॉझीटीव्ह आढळले. 96 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत.

पॉझीटिव्हपैकी 1553 जणांना घरी सोडले असून सध्या केवळ चार रूग्ण पॉझीटीव्ह आहेत. एक सीसीसी केंद्रात तर तिघे होम कॉरंटाईन आहेत. 
कोरोना महामारी सुरू झाल्यापासून त्याच्या लशीची चर्चा सुरू झाली. लस कधी येणार, याकडेच जनतेचे डोळे लागले होते. लस आली तरी ती कोणाला देणार, यात संभ्रमावस्था होती. कोल्हापुरात लस दाखल झाली आहे.

गडहिंग्लज तालुक्‍यात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून लसीकरण होणार आहे. त्याची पूर्व तयारी आरोग्य विभागाने केली आहे. पहिल्या टप्प्यात वैद्यकीय क्षेत्रातील खासगी-सरकारी डॉक्‍टर्स, कर्मचारी, वैद्यकीय महाविद्यालयांमधील डॉक्‍टर्स, कर्मचारी अशा आरोग्य क्षेत्रात फ्रंटलाईनला काम करणाऱ्यांना लसीकरण होणार आहे. 2619 जणांची नोंदणी झाली असून त्यांचे मोबाईल क्रमांक, आधार कार्ड अपलोड झाले आहेत. लस ठेवण्यासाठी कोल्ड चेनचीही व्यवस्था करण्यात येणार आहे. एकूण तीन टप्प्यात लसीकरण होणार असल्याचे सांगितले. 

तीन खोल्यांची रचना... 
कोरोना लसीकरण देताना तीन खोल्यांचे नियोजन केले आहे. एका खोलीमध्ये प्रतिक्षा, दुसऱ्यात लसीकरण आणि तिसऱ्या खोलीत लसीकरण झालेल्या स्वयंसेवकांना अर्धा तास नियंत्रणाखाली ठेवण्यात येईल. त्यांना कोणते रिऍक्‍शन आले तरी त्यासाठीचे उपचार सज्ज ठेवण्यात येतील. शेजारीच रूग्णवाहिकाही तैनात राहणार असल्याची माहिती डॉ. अथणी व डॉ. आंबोळे यांनी पंचायत समिती सभागृहात दिली. 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com