कोल्हापुरातील गंगावेस तालमीने जपलीय बंधुभाव, एकोप्याची संस्थानकालीन परंपरा

ganesh festival and moharam festival together celebrated in gangavesh talim mandal in kolhapur
ganesh festival and moharam festival together celebrated in gangavesh talim mandal in kolhapur
Updated on

कोल्हापूर : समता, बंधुभाव, एकोपा अशी परंपरा संस्थानकाळापासून करवीर नगरीला लाभली आहे.  गणेशोत्सव व मोहरम हे सण एकत्रित साजरा करण्याची वेगळी परंपरा या शाहूनगरीत रुजली आहे. त्यामुळे कोल्हापुरातील सामाजिक वातावरण हिंदू-मुस्लिम सलोख्याचे आहे. शहरातील शाहू विजयी गंगावेस तालमीत मोहरम व गणेशोत्सव एकत्रित साजरी करण्याची परंपरा जवळपास शंभर वर्षापासून अखंडित सुरू आहे. 

गंगावेस तालीमीने महाराष्ट्राला अनेक चांगले मल्ल दिले. मल्लविद्येची परंपरा पुढे चालवताना या तालीम मंडळाने गणेशोत्सवा बरोबर मोहरम वेळी पंजाची प्रतिष्ठापना करतात सलोख्याचे बंध जपले आहेत. राजर्षी शाहू महाराजांनी नारायण जाधव यांना येथे मर्दानी खेळाच्या सरावासाठी ही जागा देऊ केली होती.  नंतर काही दिवसात पीर सई साहेब यांच्या स्थानाची प्रतिष्ठापना येथे झाली.  या ठिकाणी कुस्ती आखाडा ही सुरु व्हावा अशी इच्छा शाहू महाराजांची होती. जी पुढे राजाराम महाराजांनी या ठिकाणी आखाडा बांधत पुर्ण केली. सध्या आखाड्याच्या बाजूलाच सई साहेबांचे स्थान आहे. 

पैलवानांचे आराध्य दैवत हनुमाना बरोबर पीर साहेबांची पूजा-अर्चा या ठिकाणी कायम चालत आली आहे. जाधव व नाईक घराण्यांचे पंजे येथे आहेत. मोहरम काळात विविध मानकऱ्यांना येथे सेवेचा मान मिळतो. चौर्याचे मानकरी जाधव दरवार, दिवट्याचे मानकरी सूर्यवंशी तर हाराचे मानकरी पठाण बंधू हे आहेत. 

गणेशाची आरती तसेच पण उद - धूप वाहण्याचा कार्यक्रम एकत्रित होतो. शहरातील पीर भक्त येथे दर्शनासाठी हजेरी लावतात. शाहू संस्थांकडून या पंजास सोनेरी जरीचे वस्त्र भेट मिळाले आहे, पण ज्याची स्थापना करणे पूजा तसेच भक्तांकडून आलेली तोरणे बांधण्याचे काम मुजावर बंधू करत आहेत. या उत्सावात अठरापगड जातीची मंडळी सहभागी होतात. 

पंजा मिरवणुकीत मल्लांचा सहभाग 

गंगावेस तालमीत कोल्हापूर सह सोलापूर, अहमदनगर सातारा तसेच इतर जिल्ह्यातील सर्व जातीधर्मातील मल्ल कुस्तीच्या सरावासाठी असतात. हे मल्ल मोहरम आणि गणेशोत्सवाच्या कार्यक्रमात उत्साहात सहभागी होतात.  सर्व मल्ल व भक्त फेटे बांधून पारंपारिक वाद्याच्या तालावर पंजा मिरवणुकीत सहभागी असतात. पंजाची स्वारी नंतर पंचगंगा नदीकडे विसर्जनासाठी जाते. गंगावेस तालीम मंडळाकडून हिंदू-मुस्लिम ऐक्याची प्रतीक असणारा हा उत्सव सुरु आहे. 

 मोहरम मधून स्वातंत्र्य सैनिकांना मदत 

इंग्रज राजवटीत विविध स्वातंत्र्यसैनिक इंग्रजांना चकवा देत या तालमीत वास्तव्याला असायचे. यावेळी येथील वस्ताद अण्णाप्पा पडळकर हे पंजाच्या मानकर्यांकडून  शिधा गोळा करून स्वातंत्र्यसैनिकांच्या जेवणाची सोय करत.तसेच गल्लीतून धान्य मदत गोळा करून सर्व समाजासाठी मोहरम मध्ये मोठे जेवण ठेवत असत.

"तालमीत एकत्रित साजरा होणारा गणेशोत्सव व मोहरम हा एक आनंदोत्सवच. या उत्सवात सर्व मल्ल सहभागी होत आणि आजही ही परंपरा तालमीने जपली आहे." 

- पै. आस्लम काझी, कुस्तीसम्राट

"तालमीचे सर्व कार्यकर्ते, मानकरी, मल्ल मिळून प्रत्येक वर्षी पंजाची प्रतिष्ठापना करतात. सर्व जाती-धर्मातील लोक त्यामध्ये सहभागी होतात."

- संदीप जाधव, मानकरी

संपादन - स्नेहल कदम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com