प्रदूषण टाळण्याचा निर्धार करत युवकांनी केले पर्यावरणपूरक गणेशमूर्तींचे विसर्जन

ganesh immersion and its impact on environment  event for Young Inspirers Network and  Yashwantrao Chavan College
ganesh immersion and its impact on environment event for Young Inspirers Network and Yashwantrao Chavan College
Updated on

कोल्हापूर : 'गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर,' या गजरात पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशमूर्तींचे आज विसर्जन झाले. पर्यावरण बचावाचा संदेश देत प्रदूषण टाळण्याचा निर्धार तरुणाईने यावेळी केला‌. निमित्त होते यंग इन्स्पिरेटर्स  नेटवर्क (यिन) व कोल्हापूर महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातर्फे (केएमसी) आयोजित पर्यावरणपूरक पद्धतीने घरगुती गणेशमूर्ती विसर्जन उपक्रमाचे.

पंचगंगा नदी, रंकाळा, कोटीतीर्थ, कळंबा, राजाराम तलावासह शहर परिसरातील विहिरींवर दरवर्षी गणेश मूर्तींचे विसर्जन केले जाते. काही गणेशभक्त गणेश मूर्ती दान करण्यास प्रतिसाद देतात. पर्यावरणाचे प्रदूषण होऊ नये, ही त्यामागची भावना असते. महापालिकेने कोरोनाच्या संसर्ग टाळण्यासाठी प्रत्येक प्रभागात ठेवलेल्या काहिलीत मूर्तींचे विसर्जन करण्याचे  आवाहन केले. सामाजिक बांधिलकीचे भान ठेवत यिनमधील तरुणाईने यासाठी पुढाकार घेतला.

आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, सकाळ माध्यम समूहाचे संपादक संचालक श्रीराम पवार, निवासी संपादक निखिल पंडितराव यांच्या हस्ते केएमसीच्या मैदानावर ठेवलेल्या काहिलीत मूर्तींचे विसर्जन झाले. यावेळी 'गणपती बाप्पा मोरया,' 'मंगलमूर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या,' अशा गजरात बाप्पांना निरोप देण्यात आला. केएमसीचे एनसीसी छात्रसैनिक व एनएसएस स्वयंसेवक उपक्रमात सहभागी झाले. 

प्राचार्य डॉ. प्रशांत नागावकर यांनी स्वागत केले. याप्रसंगी नगरसेवक शेखर कुसाळे, नगरसेवक  प्रतापसिंह जाधव, प्रा. राजेंद्र कोळेकर, डॉ. आर. यु. बडसकर, प्रा. मीना काळे, डॉ. संजय कांबळे, प्रा. किरण भोसले,  प्रा. रवि मांगले, प्रा. सचिन धुर्वे, प्रा. साजिद शेख, प्रा. रवि दामुगडे, प्रा. एच.‌ टी. कांबळे, प्रा. अमित रेडेकर,  व्ही. व्ही. मेस्त्री,  एस. एस. आडगुळे, प्रकाश टिपुगडे, सुधाकर‌ लाड, परशराम खांडेकर, अरुण शिंदे, शिवाजी दाते, विलास घाटगे, रंजना कांबळे उपस्थित होते. यिनचे विभागीय समन्वयक अवधूत गायकवाड यांनी संयोजन केले. 

तरुणाईला विधायक मार्गाला लावणारे यिनचे व्यासपीठ आहे. तरुणाईच्या नेतृत्वगुणाला यिनमुळे ऊर्जा मिळत आहे. मूर्तींचे काहिलीत विसर्जन करून पर्यावरणविषयक जाणीव घट्ट करण्याचा आज प्रयत्न झाला. यापुढे ही तरूनाई पर्यावरणाच्या संरक्षणाचा गांभीर्याने विचार करेल व पर्यावरणविषयक चळवळ बळकट करेल यात शंका नाही.

- डॉ. प्रशांत नागावकर (प्राचार्य, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय)

पर्यावरणपूरक गणेशमूर्ती विसर्जनासाठी  महानगरपालिकेकडून मास्क व सॅनिटायझर उपलब्ध करुन देण्यात आले. सोशल डिस्टन्स ठेवून गणेशमूर्तींचे विसर्जन झाले.

संपादन - अर्चना बनगे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com