कोल्हापूर : गारगोटीत गटविकास अधिकाऱ्यांना धरले धारेवर      

gargoti Group Development Officer kolhapur marathi news
gargoti Group Development Officer kolhapur marathi news
Updated on: 

गारगोटी : येथील ग्रामपंचायतीला कायमस्वरूपी ग्रामविकास अधिकारी मिळावा या मागणीसाठी सरपंचांसह सत्ताधारी सदस्य व कर्मचाऱ्यांनी पंचायत समितीच्या प्रवेशद्वारात ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनाकडे गांभीर्याने लक्ष न देणाऱ्या गटविकास अधिकारी एस. जे. पवार यांना अडवून याप्रश्नी जाब विचारत पंचायत समिती सदस्या गायत्री भोपळे व सरपंच संदेश भोपळे यांनी चांगलेच धारेवर धरले. 

सरपंच संदेश भोपळे म्हणाले, येथील ग्रामपंचायतीसाठी दोन वर्षात तब्बल १४ ग्रामविकास अधिकारी नियुक्त केले गेले. विद्यमान आमदार व त्यांचे ग्रामपंचायत सदस्य याप्रश्नी राजकारण करून सत्ताधार्यांची अडवणूक करीत असल्याचा आरोप केला. तर उपसरपंच स्नेहल कोटकर, सदस्य जयवंत गोरे यांनीही विद्यमान आमदार व त्यांच्या सदस्यांकडून ग्रामविकास अधिकारी नियुक्तीतील राजकारणाचा ग्रामपंचायत व जनतेच्या कामावर परिणाम होत असल्याचे सांगितले. 

दरम्यान, ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या या आंदोलनाकडे गांभीर्याने लक्ष न देता बाहेर जात असलेल्या गटविकास अधिकारी एस. जे. पवार यांना पंचायत समिती सदस्या गायत्री भोपळे, सरपंच संदेश भोपळे, उपसरपंच स्नेहल कोटकर व ग्रामपंचायत सदस्यांनी वाहनासह रोखले. या वेळी गटविकास अधिकारी व आंदोलनकर्त्यांत शाब्दिक बाचाबाची झाली. पोलिसांनी हस्तक्षेप करून गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन घेण्यास भाग पाडले. ग्रामपंचायत सदस्य सचिन देसाई, प्रकाश वास्कर, अलकेश कांदळकर, सुकेशनी सावंत, आशाताई भाट, मेघा देसाई, जयवंत गोरे, रुपाली कुरळे, राहुल  कांबळे, अस्मिता कांबळे, सविता गुरव यांच्यासह कर्मचार्यांनी आंदोलनात सहभाग घेतला.  

संपादन - धनाजी सुर्वे 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Kolhapur Drought, Six Talukas, District Bank Resolution
32-year-old Vikas Chougale drowned in Kasari River
Pune MLC Election, Graduate Teacher Seats,
Maharashtra sugar season
Marathi News Esakal
www.esakal.com