Gas cylinder subsidy closed  Consumer confusion for four months
Gas cylinder subsidy closed Consumer confusion for four months

गॅस सिलिंडरच्या किमती झाल्या कमी : अनुदान बंद

कोल्हापूर : गॅस सिलिंडरच्या किमती कमी झाल्या आहेत. सध्या सिलिंडरची किंमत ५९७ रुपये आहे. या किमतीच्यावर दर गेले तरच ग्राहकांना अनुदान दिले जाते; मात्र किंमत कमी झाल्यामुळे चार महिन्यांपासून अनुदान बंद केले आहे. त्यामुळे हे अनुदान बंद का झाले यावरून ग्राहक संभ्रमात आहेत.

देशात गॅस ग्राहकांना कमीत कमी किमतीत गॅस मिळाला पाहिजे. गॅसचा मूलभूत (बेसिक) दरही कमी झाला पाहिजे, यासाठी आंदोलने होत आहे. गॅसच्या मूलभूत दरापेक्षा जास्त किंमत झाल्यास सरकार तेवढ्याच किमतीचे अनुदान देते. एप्रिलपासून गॅसच्या मूलभूत (बेसिक) दरात वाढ झालेली नाही. सध्या प्रति सिलिंडर ५९७ रुपये मूळ किंमत आहे. या किमतीच्या वर म्हणजेच प्रति सिलिंडर ७०० रुपये दर झाल्यास सरकारकडून ५९७ रुपयांच्या वरती होणारी रक्कम म्हणजे १०३ रुपये ग्राहकांच्या बॅंक खात्यावर अनुदान म्हणून जमा केले जाते.

ग्राहकांना वर्षाला १४.५ किलोच्या १२ सिलिंडरवर अनुदान दिले जाते. एखाद्याला यापेक्षा जास्त सिलिंडर लागत असतील तर ती विनाअनुदानित रकमेने खरेदी करावे लागतात. 
सहा लाखांवर ग्राहक जिल्ह्यात सुमारे ६ लाखांहून अधिक सिलिंडर ग्राहक आहेत. महिन्याला सुमारे सहा कोटीपर्यंत अनुदान मिळत होते.दरम्यान, गॅसचे दरच कमी झाल्यामुळे अनुदान जमा केले जात नाही.

मूलभूत दरापेक्षा गॅसची किमती जास्त झाल्यास सरकार अनुदान देते. सध्या मूलभूत दराएवढाच गॅस दर आहे. त्यामुळे अनुदान बंद केले आहे. ज्या वेळी गॅस दर मूलभूत दरापेक्षा जास्त होईल, त्यावेळी वाढलेला दर हा अनुदान म्हणून ग्राहकांच्या बॅंक खात्यावर जमा केला जातो.
- श्री आदित्य, एचपीसी गॅस विक्री अधिकारी

गॅसचे दर कमी झाले आहेत. मूलभूत दरापेक्षा जास्त दर झाल्यास सरकार अनुदान देते. सध्या अनुदान बंद आहे. गॅसचे दर वाढल्यानंतर पुन्हा अनुदान जमा होईल.
- कौस्तुभ नलगे, जय गॅस ऐजन्सी, केएमसी कॉलेजसमोर


जिल्ह्यातील जानेवारी २०२० ते सप्टेंबर २०२०पर्यंतचे प्रतिसिलिंडर गॅसचे दर व मिळणारे अनुदान असे :
महिना    गॅस दर     मिळालेले अनुदान
जानेवारी     ६९९    १०२ 
फेब्रुवारी     ८४४    २४७ 
मार्च    ७९०    १९३
एप्रिल    ७२९    १३२
मे    ५८३    १४ 
जून    ५९५    नाही
जुलै    ५९७    नाही
ऑगस्ट    ५९७     नाही 
सप्टेंबर    ५९७     नाही
 

संपादन - अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com