गॅस सिलेंडरच्या चालत्या ट्रकने कागल जवळ घेतला पेट....

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 फेब्रुवारी 2020

लक्ष्मीटेक वर आल्यावर ट्रकच्या मागील भागात आग लागली. रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकीस्वारांनी ही गोष्ट चालकाच्या लक्षात आणून दिली.

कागल - एच.पी गॅस कंपनीच्या गॅस सिलेंडर च्या ट्रकला आग लागण्याचा प्रकार आज सकाळी साडे दहाच्या सुमारास पुणे - बेंगलोर हावयेवर कागल जवळील लक्ष्मीटेक परिसरात घडला. एमआयडीसी तसेच कागल नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या दोन बंबांनी अर्धा तास प्रयत्न करत आग आटोक्यात आणली गेली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. पलूस (जि.सांगली) येथील डेपोतून एच.पी गॅस कंपनीचे सिलेंडर भरून हा ट्रक बानगे (ता.कागल) येथील वितराकडे निघाला होता.

ट्रक मधील गॅस सिलेंडर होते भरलेले

अचानक लक्ष्मीटेक वर आल्यावर ट्रकच्या मागील भागात आग लागली. रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकीस्वारांनी ही गोष्ट चालकाच्या लक्षात आणून दिली. आग लागताच चालकाने जाग्यावर ट्रक थांबून कागल नगरपालिकेला वर्दी दिली. तत्काळ कागल नगरपालिकेच्या अग्निशामक दलाचे तसेच एमआयडीसीच्या अग्निशमन विभागाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अर्धा तास सतत पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणण्यात यश मिळवले.ट्रक मधील सिलेंडर गॅसने भरलेले होते. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The gas cylinder truck caught fire near kagal kolhapur