
बेळगाव - बेळगाव शहरातील साडेआठ हजार घरांमध्ये वाहीनीतून थेट गॅसपुरवठा सुरू झाला आहे. शहरातील 23 हजार घरमालकांनी गॅस जोडणीसाठी नोंदणी केली आहे. तर 16 हजार घरांना जोडणी देवून मीटर बसविण्यात आले आहे. या 16 हजार घरांनाही लवकरच गॅस पुरवठा केला जाणार आहे. शहरातील 50 हजार घरांमध्ये वाहीनीतून गॅसपुरवठा करण्याचे उद्दीष्ट आहे. येत्या वर्षभरात हे उद्दीष्ट पूर्ण केले जाणार आहे. या 50 हजार घरांमध्ये थेट वाहीनीतून गॅस पुरवठा केला जाईल. पाईप्ड नॅचरल गॅस अर्थात पीएनजीचा पुरवठा केला जाईल. त्यामुळे या घरांमध्ये स्वयंपाकासाठी एलपीजी घ्यावा लागणार नाही. पीएनजीचा किती वापर झाला हे मीटरमुळे कळेल, मीटरनुसार बिल आकारणी केली जाईल. एलपीजीपेक्षा हा गॅस हलका, स्वस्त व कमी धोकादायक असल्याचे मेगा गॅस कंपनीचे म्हणने आहे.
घरोघरी वाहीनीतून गॅस पुरवठा करण्याची योजना केंद्र शासनाची आहे. स्मार्ट सिटी योजनेतून तीची अंमलबजावणी केली जात आहे. 25 जून 2016 रोजी बेळगावचे तत्कालीन पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ झाला होता. पण महापालिकेकडून रस्ते खोदाईला परवानगी विलंबाने मिळाल्यामुळे योजनच्या कार्यवाहीलाही बिलंब लागला होता. दाभोळ-बंगळूर ही गॅसवाहीनी बेळगाव शहरातून जाते. त्यामुळे बेळगाव शहरासाठी केंद्राने ही योजना मंजूर केली. दाभोळ-बंगळूर गॅसवाहीनीचे वितरण केंद्र शहरातील ऑटोनगर परीसरात आहे. तेथून नवी गॅसवाहीनी घालून बेळगाव शहरात पुरवठा केला जात आहे. हैद्राबाद येथील मेगा गॅस कंपनीला या योजनेचा ठेका मिळाला आहे. शहरात गॅसवाहीनी घातल्यानंतर कंपनीकडून सर्वात आधी रामतीर्थनगर येथे जोडण्या देण्यात आल्या. त्यानंतर शहराच्या उत्तर भागातील बहुतेक सर्व उपनगरांमध्ये थेट वाहीनीतून गॅस पुरवठा केला जात आहे.
गॅस जोडणीसाठी कंपनीकडे ऑनलाईन नोंदणी करता येते. किंवा कंपनीशी संपर्क साधल्यास प्रतिनिधी पाठवून दिला जातो. जोडणीसाठी 5 हजार रूपये शुल्क आकारले जाते, त्यातील साडेचार हजार रूपये हे रिफंडेबल असतात असे कंपनीचे म्हणने आहे. ही योजना चांगली असली तरी शहरातील अठरा गल्ल्यांमध्ये तीची अंमलबजावणी करणे अशक्य असल्याचे कंपनीचे म्हणने आहे. या अठरा गल्ल्या तसेच शहापूर परीसरातील ज्या जुन्या गल्ल्या आहेत, तेथे घरे एकमेकांना खेटून असल्यामुळे तेथे जोडणी देणे अशक्य व धोकादायक असल्याचे कंपनीचे म्हणने आहे. त्यामुळे उपनगरांमधील घरे, संकुलातील सदनिकांमध्ये जोडणी दिली जात आहे.
शहरातील 50 हजार घरांना गॅस जोडणी देण्याचे उद्दीष्ट आहे. आतापर्यंत साडेआठ हजार घरांमध्ये गॅस पुरवठा सुरू झाला आहे. स्वस्त, हलका व सुरक्षीत असा हा गॅस आहे.
- कामील पाटाईत, सहयोगी व्यवस्थापक. मेगा गॅस
संपादन - मतीन शेख
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.