यमगेत गॅस्ट्रोची साथ

प्रतिनिधी
Wednesday, 22 April 2020

विद्यानगर हरिजन वसाहत चांभार गल्ली आदी ठिकाणचे जवळपास 112 रुग्ण या साथीच्या रोगाचे बळी पडले आहेत. यात वीस ते पंचवीस महिला रुग्ण आहेत. तर उर्वरीत पुरुष रुग्ण आहेत. या सर्व रुग्णांना जुलाब सुरू झाले. दुपारी दहा ते बारा रूग्ण होते.रात्री नऊनंतर मात्र या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत गेली.

मुरगूड  : यमगे (ता. कागल) येथे गॅस्ट्रोची साथ सुरु झाली आहे. गावात पिंपळगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय पथक दाखल झाले असून विविध गल्लीतील सुमारे 112 जणांवर गावातील प्राथमिक शाळेमध्ये उपचार सुरू करण्यात आले आहेत. गावाला पिण्याचे पाणी पुरवठा केले जाणारे पाणी दूषित झाल्यामुळे ही साथ सुरू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. 
अधिक माहिती अशी, यमगे (ता.कागल) येथे नळ पाणीपुरवठा योजनेद्वारे गावाला पिण्याच्या पाणी पुरवठा केला जातो. विद्यानगर परिसरात पाण्याच्या टाकीवर गेल्या चार पाच वर्षापासून झाकण नाही, याच टाकीतले पाणी बहुतांशी ठिकाणी पुरवठा केले जाते आणि याच परिसरात ही साथ पसरली आहे. 
विद्यानगर हरिजन वसाहत चांभार गल्ली आदी ठिकाणचे जवळपास 112 रुग्ण या साथीच्या रोगाचे बळी पडले आहेत. यात वीस ते पंचवीस महिला रुग्ण आहेत. तर उर्वरीत पुरुष रुग्ण आहेत. या सर्व रुग्णांना जुलाब सुरू झाले. दुपारी दहा ते बारा रूग्ण होते.रात्री नऊनंतर मात्र या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत गेली. सध्या लक्ष्मीबाई रानगे,मेघा डोणे,अलका पाटील,आक्काताई डोणे, सुनिता पाटील,सुवर्णा वारके, रूपाली वारके,शोभा वारके,प्रशांत माने,दादासो पाटील,शुभांगी पाटील,सुजाता पाटील,रुक्‍मिणी पाटील,सत्यजित पाटील,ओंकार पाटील,राजू वारके,परशुराम राजिगरे,भास्कर कुंभार यांच्या सह 112 हून अधिक रुग्ण आहेत. या सर्व रुग्णांवर यमगे येथील प्राथमिक शाळेच्या खोल्या तसेच शाळेच्या व्हरांड्यामध्ये पिंपळगाव बुद्रुक येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय पथकाने उपचार सुरू केले आहेत.वैद्यकीय अधिकारी,आरोग्य सेवक,आरोग्य सेविका आहेत.आशा स्वयंसेविका,हे रुग्णांना योग्य तो औषधोपचार करतआहेत.तर याठिकाणी सरपंच,उपसरपंच, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य,गावातील कांही स्वयंसेवक आरोग्य यंत्रणेला सहकार्य करत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gastro accompaniment at Yamagate