कोल्हापुर जिल्हाधिकारी कार्यालयात 'नो गिफ्ट प्लिज' ची रंगतीये चर्चा

gift for collector office employees diwali festival are stopped for last two years in kolhapur
gift for collector office employees diwali festival are stopped for last two years in kolhapur
Updated on

कोल्हापूर : दिवाळी म्हंटले की सरकारी बाबूंना गिफ्टची रेलचेल असते. गावपातळीवर काम करणाऱ्या सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांपासून ते जिल्हाधिकारी कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांपर्यंत गिफ्ट देवून दिवाळी शुभेच्छा दिल्या जातात. गेल्या दोन वर्षापासून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मात्र 'नो गिफ्ट प्लीज' असा फलक लावला जात आहे. 

जिल्हाधिकारी दौलत देसाई येणाऱ्या प्रत्येकांच्या शुभेच्छा स्विकारतात. पण गिफ्ट नाही. हे याधी कधी पाहयला मिळाले नाही. त्यामुळे, जिल्हाधिकारी देसाई यांच्या या फलकाचे कौतुक केले जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी गेल्या दोन वर्षापासून आपल्या दालनाबाहेर नो गिफ्ट प्लीज (गिफ्ट स्विकारले जाणार नाही) असा फलक लावला आहे. 

कोण मिठाई तर कोणाकडून महागड्या भेट वस्तू दिल्या जातात. जिल्हाधिकाऱ्यांकडूनच गिफ्ट स्विकारणे बंद केल्यामुळे इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना येणारी रंगीत आणि चकाचक पाकिट बंद झाली आहेत. ठराविक अधिकारी आणि कर्मचारी या पासून चार हात लांबच राहतात. पण अनेकजण या गिफ्टसाठी दरवाजे उघडून वाट पाहतात. 

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com