कोल्हापूर जिल्ह्यात लॉकडाऊनमध्ये 2201 टन खतांचा पुरवठा...
कोल्हापूर - कोरोनामुळे लॉकडाऊन असणाऱ्या कोल्हापूरमध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 2201 मेटिक टन खतांची विक्री करुन शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. संघाचे अध्यक्ष जी. डी. पाटील यांचे योग्य नियोजन आणि संचालक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दिलेल्या पाठबळामूळे बंद काळातही संघाच्या सर्व शाखा सुरु ठेवून शेतकऱ्यांना अपेक्षीत खत पुरवठा करण्यात शेतकरी संघाने पुढाकार घेतला. रेशनवरील गहू, तांदुळ वाटपासह शासनाच्या नियमानूसार व सूचनेनुसार अत्याश्यक सेवीसाठी पेट्रोल विक्रीही सुरू ठेवल्याने निश्चितपणे याचा शेतकरी संघाला फायदा होणार आहे.
लॉकडाऊन मूळे जिल्ह्यात युरियासह महत्वाची खतांचा तुटवडा आहे. शेतकऱ्यांना अपेक्षीत आणि आवश्यक खते मिळाव्यात यासाठी अनेक ठिकाणी चौकशी केली जात आहे. शहरासह ग्रामीण भागातील सहकारी तत्वावर सुरु असणारी काही खतांची दुकाने बंद आहे. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. याउलट, शेतकरी सहकारी संघाने बंद काळातही तब्बल 2201 मेट्रिक टन खतांची विक्री केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. शेतकरी संघाकडून 1200 टन दाणेदार खत, याशिवाय, 1000 टन युरिया, डिएपी, एमओपी, निंबोळी पेंढीसह इतर खतांची विक्री केली आहे.
लॉकडाऊनमध्ये कोणालाच घराबाहेर पडता येत नाही. अशावेळेला शासनाने दिलेल्या नियमानूसार 2 हजार 914 क्विंटल तांदूळ व 2 हजार 100 टन धान्य वाटप केले आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर शेतकरी संघाकडे खते कमी दिसतील. पण खते कमी पडू नयेत यासाठी या महिन्याच्या शेवटी येणाऱ्या खतांच्या रॅकमधून संघासाठी खते मागवण्यात आली आहेत. त्यामुळे संघाकडून ऍडव्हान्सही दिली आहे. 200 टन युरिया आणि सुफला घेतला जाणार आहे. यासाठी सर्व शाखांचे आर्थिक ताळेबंद तयार केला आहे.
शेतकऱ्यांकडून मोठ्याप्रमाणात रासायणिक खतांची मागणी आहे. लॉकडाऊनमूळे इतर ठिकाणाहून शेतकऱ्यांना अपेक्षीत खत पुरवठा झालेल्या नाही. याउलट शेतकरी संघाने 2201 मेट्रिक टन खतांचा पुरवठा करुन शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. शासनाने लॉकडाऊनमधून शेतीला वगळले आहे. त्यामुळे शेतकरी आपले कामे वेळेत पूर्ण करावीत यासाठी संघाने कोणतीही कसूर सोडली नाही. यासाठी, पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, आमदार विनय कोरे, माजी अध्यक्ष युवराज पाटील यांनीही या कामासाठी चांगली मदत केली.
जी. डी. पाटील - अध्यक्ष, शेतकरी संघ, कोल्हापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.