सत्यजित आघाडी सोडून का गेले समजत नाही ; सतेज पाटील

gokul election kolhapur Former MLA Satyajit Patil dropped on gokul marathi news
gokul election kolhapur Former MLA Satyajit Patil dropped on gokul marathi news

कोल्हापूर : गोकुळच्या निवडणुकीत राजर्षी शाहू शेतकरी आघाडीसोबत असल्याचे माजी आमदार सत्यजित पाटील यांनी सांगितले होते. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत चर्चाही झाली होती. शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी लढण्यासाठी पाटील यांनीही साथ देणार असल्याचे सांगितले होते; पण ते आघाडी सोडून का गेले हे समजू शकले नाही, अशी माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली.

दरम्यान, याच कारणासाठी पाटील व मुश्रीफ यांनी खासदार संजय मंडलिक, आमदार विनय कोरे, ‘गोकुळ’चे ज्येष्ठ संचालक विश्‍वास पाटील, अरुण डोंगळे, के. पी. पाटील, ए. वाय. पाटील यांची बैठक झाली. यामध्ये पाटील सत्तारूढ गटासोबत का गेले, याची चर्चा झाली. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी आमदार राजेश पाटील यांच्या निवासस्थानी भेट देऊन पॅनेल निश्‍चितीबाबत चर्चा केली.
माजी आमदार पाटील यांनी भाजपचा घटक पक्ष असलेल्या आघाडीत जाऊ नये, असा रेटा कार्यकर्त्यांनी लावला होता. त्यानंतर कार्यकर्त्यांच्या मागणीचा विचार करत सत्यजित यांनी आज सत्तारूढ गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे, विरोधी पॅनेलच्या नेत्यांनी चर्चेसाठी त्यांच्यासोबत असणाऱ्या नेते व ज्येष्ठ संचालकांची आज बैठक घेतली. 

सत्यजित पाटील आपल्यासोबत येणार होते. त्यांच्या कार्यकर्त्यांसोबतही बोलले जाणार होते; मात्र आज पी. एन. पाटील आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी सत्यजित यांच्याशी चर्चा केली. यावेळी  पाटील यांनी सत्तारूढ गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला. यावेळी, विरोधी आघाडीच्या नेत्यांसह सर्वांनीच याबद्दल चर्चा केली. तसेच दोन दिवसांपूर्वी शासकीय विश्रामगृहात आमदार राजेश पाटील यांची नाराजी दूर करून शाहू आघाडीसाठी चर्चा झाली. त्यावेळीच झालेली चर्चा पूर्ण करण्यासाठी आज मुश्रीफ व श्री. पाटील यांनी आमदार पाटील यांच्या घरी पॅनेल बांधणीबाबत चर्चा केली. तसेच त्यांची नाराजी दूर केली.

दुपारची झोप उडाली
‘गोकुळ’मध्ये विरोधी पॅनेल सक्षम झाल्याने दुपारी बाराची झोप सोडून सत्तारूढांना प्रचारासाठी फिरावे लागत आहे. विरोधक सांगतात तसे शाहू आघाडीत सत्तारूढ अफवा पसरवून फूट पाडण्याचा प्रयत्न करतील; पण आम्ही सक्षम आणि समर्थ आहोत, कोणत्याही स्थितीत आमच्यात मतभेद होणार नाहीत, असा विश्‍वास पालकमंत्री सतेज पाटील 
यांनी व्यक्त केला.

संपादन- अर्चना बनगे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com