- प्रीमियम
- ताज्या
- मुख्य
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- देश
- ग्लोबल
- कोरोना
- अर्थसंकल्प
- आणखी..
- धन की बात
- अर्थसंकल्प
- जॉब नौकरी
- फोटो स्टोरी
- व्हिडिओ स्टोरी
- मनोरंजन
- लाईफस्टाईल
- टुरिझम
- हेल्थ फिटनेस वेलनेस
- व्हायरल सत्य
- सप्तरंग
- मुक्तपीठ
- फॅमिली डॉक्टर
- पैलतीर
- लाईव्ह अपडेट्स
- अॅग्रो
- सिटिझन जर्नालिझम
- राशी भविष्य
- संपादकीय
- सायन्स टेकनॉलॉजि
- अग्रलेख
- कायदा विश्व
- जगाच्या नजरेतून
- ढिंग टांग
- रंग मुंबईचे
- क्रीडा
- एज्युकेशन जॉब्स
- श्री गणेशा २०२०

"गोकुळ' च्या प्रारूप मतदार यादीवर 24 फेब्रुवारीअखेर 76 हरकती दाखल झाल्या होत्या

कोल्हापूर - कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) प्रारूप मतदार यादीवर दाखल झालेल्या 76 हरकतीपैकी चार तालुक्यातील 16 हरकतींवरील सुनावणी आज विभागीय उपनिबंधक (दुग्ध) सुनिल सिरापूरकर यांच्यासमोर पूर्ण झाली. या सर्व हरकती दुबार ठरावाविषयी होत्या. उद्या (ता. 3) सहा तालुक्यातील हरकतींवरील सुनावणी होणार आहे.
"गोकुळ' च्या प्रारूप मतदार यादीवर 24 फेब्रुवारीअखेर 76 हरकती दाखल झाल्या होत्या. या हरकतींवरील सुनावणी आजपासून सहनिबंधक (दुग्ध) गजेंद्र देशमुख यांच्या कार्यालयात सुरू झाली. आज कागल, करवीर, शाहुवाडी व पन्हाळा तालुक्यातील 16 हरकतींवरील सुनावणी पूर्ण झाली. यातील सुमारे दहा संस्थांच्यावतीने ऍड. दत्ता राणे यांनी बाजू मांडली.
उद्या (ता. 3) राधानगरी, भुदरगड, आजरा, चंदगड, गडहिंग्लज व गगनबावडा तालुक्यातून दाखल झालेल्या हरकतींवरील सुनावणी घेण्यात येणार आहे. यात बहुंताशी हरकती या मयत ठरावदारांचे नांव बदलण्याविषयी आहेत. या हरकतीनुसार दाखल झालेला बदल करण्यात येईल. दुबार ठरावावर मात्र सुनावणी घेण्यात येणार आहे. या हरकतीवरील निकाल 8 मार्च रोजी देण्यात येणार आहे तर अंतिम मतदार यादी 12 मार्च रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे.
संपादन - धनाजी सुर्वे
