गोकूळची सभासद संस्था एक, ठराव दोन, प्रोसिडींग मात्र तीन

 Gokul's member body is one, resolution two, proceedings  three
Gokul's member body is one, resolution two, proceedings three


कोल्हापूर ः संस्था एकच, ठराव दोन आणि प्रोसिडींग (इतिवृत्त) तीन घेऊनच आज संस्थेच्या सचिवांसह ठरावदार "गोकुळ' च्या हरकतीवरील सुनावणीवेळी हजर राहिल्याने अधिकाऱ्यांचीही पंचाईत झाली. त्यात ज्या सचिवांच्या सहीने दोन ठराव दाखल झाले. त्यांनीच ठराव न झाल्याची माहिती सुनावणीवेळी दिली. करवीर तालुक्‍यातील एका गावांतील संस्थेबाबत हा प्रकार आज उघडकीस आला. 
"गोकुळ' च्या प्रारूप मतदार यादीवर दाखल झालेल्या हरकतीवरील सुनावणी विभागीय उपनिबंधक (दुग्ध) सुनिल सिरापूरकर यांच्यासमोर गेल्या दोन दिवसांपासून सुरू आहे. यादीवर सुमारे 76 हरकती दाखल झाल्या आहेत. यापैकी दुबार ठरावाच्या 36 हरकतीवरील सुनावणी यापुर्वी पूर्ण झाली आहे. यातील दहा - पंधरा हरकतीवर तडजोड झाली आहे. उर्वरित हरकती पैकी 23 हरकतीवरील सुनावणी आज झाली. 
करवीर तालुक्‍यातील एका संस्थेचे दोन ठराव दाखल झाले होते. त्यावरील सुनावणी दरम्यान ठरावदारांसह सचिव आणि संचालक ही उपस्थित होते. दुबार ठरावाची नोंद असलेले प्रोसिडींग श्री. सिरापूकर यांनी मागितल्यानंतर तिघांकडूनही प्रोसिडींग सादर करण्याची तयारी दर्शवण्यात आली. यात विशेष म्हणजे ज्या सचिवांच्या सहीने हे ठराव दाखल झाले, त्यांनी ठरावच झाला नसल्याची माहिती यावेळी दिल्याने अधिकाऱ्यांचीही पंचाईत झाली. 
कागल तालुक्‍यातील एका संस्थेतील ठरावदारांचे निधन झाले आहे. या संस्थेकडून मयत ठरावदारांच्या दोन सुनांचेच ठराव पुन्हा दाखल झाले आहेत. यावरील सुनावणीही आज पूर्ण झाली. उर्वरित हरकतीत प्रारूप मतदार यादीत चुकीची नावे प्रसिद्ध झाल्याने ती बदलण्यासंदर्भातील हरकती दाखल झाल्या होत्या. त्यानुसार मतदार यादीत बदल करण्यात येईल, असे सांगण्यात आले. संघाची अंतिम मतदार यादी 12 मार्च रोजी प्रसिद्ध होणार आहे. 


25 एप्रिलला मतदान शक्‍य 
"गोकुळ' च्या निवडणुकीतील न्यायालयीन अडथळे दूर झाले आहेत. 12 मार्च रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. त्यानंतरचा दहा-पंधरा दिवसांचा कालावधी पाहता एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होईल. निवडणुकीचा एक महिन्याचा कार्यक्रम पाहता 25 एप्रिल रोजी "गोकुळ'साठी मतदान होण्याची शक्‍यता आहे. 

- संपादन - यशवंत केसरकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com