नव्या शौक्षणिक धोरणा मराठी भाषेला येणार चांगले दिवस

 Good days will come for new educational policy for Marathi language
Good days will come for new educational policy for Marathi language
Updated on

कोल्हापूर ः नवे शैक्षणिक धोरण आज जाहीर करण्यात आले. यामध्ये पदवी अभ्यासक्रमाचा कालावधी वाढवण्यात आला आहे. एम.फील रद्द झाले असून पीएच.डी. करण्याचा मार्गही सुकर केला आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमांची निर्मिती, मातृभाषेतून शिक्षण आणि एकाच वेळी दोन शाखांमध्ये शिक्षण घेता येणार आहे. या गोष्टी देशातील उच्च शिक्षणाची उंची वाढवणाऱ्या असल्याचे मत शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केले. तसेच भाषेचा विकासासाठी देखील हे धोरण महत्त्वाचे असल्याचे मत त्यांनी नोंदवले आहे. याबाबतच्या प्रातिनिधीक प्रतिक्रिया. 

सर्वसमावेशक असणारे धोरण 
नव्या शैक्षणिक धोरणामध्ये पूर्व प्राथमिक ते उच्च शिक्षण या सर्वाचा दूरदृष्टीने विचार केला गेला आहे. या धोरणानुसार विज्ञान, तंत्रज्ञान याबरोबरच मानव्यशास्त्र आणि सामाजिक शास्त्रांचे महत्त्व वाढणार आहे. विशेष म्हणजे सर्वसामान्यांना शिक्षणाच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत. हे शैक्षणिक धोरण आमलात आणणे हे जरी आव्हानात्मक असले तरी ते दूरदृष्टीने बनवले असल्याचे दिसते. 
- डॉ. बी. एम. हिर्डेकर, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ. 

शैक्षणिक स्वायत्ता मिळणार 
पूर्वीच्या तक्षशिला आणि नालंदा विद्यापीठाची चेतना नव्या शैक्षणिक धोरणात दिसते. यामुळे महाविद्यालयांना शैक्षणिक स्वायत्ता मिळणार आहे. पुढील वर्षात 45 हजार स्वायत्त महाविद्यालये देशात तयार होतील. भविष्यात त्यांना आर्थिक स्वायत्ताही मिळेल. त्यातून शिक्षकांच्या पगाराचे काही प्रश्‍न तयार होण्याची शक्‍यता आहे. पण उच्च शिक्षणाचा दर्जा सुधारण्याचा दृष्टीने हे धोरण स्वागतार्ह्य आहे. या धोरणामुळे मातृभाषेला सर्वच बाबतीत प्राधान्य मिळणार आहे. शिक्षक, विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य आणि आनंद देणारे धोरण आहे. 
- प्राचार्य डॉ. राजेंद्र लोखंडे, महावीर महाविद्यालय. 

विद्यार्थी स्नेही धोरण 
नव्या शैक्षणिक धोरणानुसार एका विद्यार्थ्याला एकाचवेळी दोन विषयात पदवी अभ्यासक्रम करता येणार आहे. एमफीलचा अनावश्‍यक टप्पा रद्द झाला आहे. शिक्षणाची गुणवत्ता सुधारणार असून देशभरातील विद्यापीठांमध्ये सामायिकता निर्माण होईल. नवे शैक्षणिक धोरण विद्यार्थी स्नेही आहे. 
- प्रा. डॉ. व्ही. एन. शिंदे, उपकुलसचिव, शिवाजी विद्यापीठ. 

मराठी भाषेचा विकास होईल 
एखादी भाषा अधिकाधिक वापरात आली तर त्यातून भाषेचा विकास होतो. नव्या शैक्षणिक धोरणात मातृभाषेला महत्त्व दिले गेले आहे. प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून केल्यामुळे महाराष्ट्रातील अमराठी विद्यार्थ्यांनाही ती शिकावी लागेल. त्यातून मराठी भाषा वापरणाऱ्यांची संख्या वाढेल. त्यातून मराठी भाषेचा विकास होईल. संदर्भग्रंथ मराठीत निर्माण होतील. इंग्रजी भाषेच्या अडचणीची समस्या दूर होईल. शिक्षण सर्वत्र पोहचेल. हिंदी भाषेचा वापर टाळणाऱ्या राज्यातही राष्ट्रीय भाषेचा प्रचार आणि प्रसार होईल. 
- प्रा. डॉ. नंदकुमार मोरे, मराठी भाषातज्ज्ञ. 

-संपादन ः यशवंत केसरकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com