चंदगडचे गोपाळराव पाटील काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता जास्त

Gopalrao Patil Tends To Join The Congress Kolhapur Marathi News
Gopalrao Patil Tends To Join The Congress Kolhapur Marathi News
Updated on

चंदगड : दौलत कारखान्याचे ज्येष्ठ संचालक गोपाळराव पाटील यांनी भाजपला रामराम ठोकण्याचा निर्णय घेऊन तालुक्‍याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. त्यांनी कोणत्या गटात जावे याचा निर्णय घेण्यासाठी 11 कार्यकर्त्यांची समिती गठित केली असली तरी चर्चेचा एकूण रोख पाहता ते कॉंग्रेसमध्येच प्रवेश करण्याची दाट शक्‍यता आहे.

जिल्हा बॅंक व गोकुळ सारख्या महत्त्वाच्या संस्थांची निवडणूक तोंडावर असताना पाटील यांनी हा निर्णय घेऊन खदखद व्यक्त केली आहे. त्यांच्या निर्णयाचे लाभ आणि नुकसान काय होणार हे येणारा काळच ठरवणार आहे. 

2000 मध्ये दौलत कारखान्याच्या निवडणुकीत मेहुणे माजी आमदार नरसिंगराव पाटील यांच्या गटात बंडखोरी करून गोपाळराव पाटील यांनी निवडणूक लढवली. कारखान्याची निवडणूक जिंकल्यानंतर त्यांनी पुढे विधानसभेच्या दोन निवडणुका लढवल्या. प्रथम राष्ट्रवादी आणि त्यानंतर जनसुराज्य शक्ती पक्षातून निवडणूक लढवताना आपला गट मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकाचा आहे याची जाणीव करून दिली.

गेली वीस वर्षे या गटाने तालुक्‍यात स्वतंत्र अस्तित्व अबाधित ठेवले. दौलत कारखाना अडचणीत आल्यामुळे ही संस्था काही काळ बंद पडली; परंतु गोपाळरावांना मानणारे कार्यकर्ते ठामपणे पाठीशी असल्याने राजकारणात त्यांचे महत्त्व कायम राहिले. एकगठ्ठा मतदान असलेला मोठा गट बाजूला गेल्यामुळे भविष्यात भाजपला ही कसर भरून काढताना कसरत करावी लागेल. 

घुसमट अन्‌ रामराम 
भाजपचे वाढते प्राबल्य पाहता तीन वर्षांपूर्वी गोपाळरावांनी भाजपमध्ये प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक घडामोडी घडल्या. माजी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील यांनीही या पक्षात प्रवेश केला. विधानसभेला पक्षाने अपक्ष उमेदवार शिवाजी पाटील यांच्या पाठीशी रसद लावली. गोपाळरावांनीही पक्षाचा आदेश मानला; परंतु त्यानंतरच्या काळात पक्षात घुसमट होत असल्याचे कारण देत नुकताच त्यांनी पक्षाला रामराम ठोकण्याचा निर्णय जाहीर केला. 
 

संपादन - सचिन चराटी

kolhapurr

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com