सीमाभागात शासकीय  महाविद्यालय  ; मंत्री उदय सामंत

 Government colleges in the border areas; Minister Uday Samant
Government colleges in the border areas; Minister Uday Samant
Updated on

कोल्हापूर : सीमाभागातील विद्यार्थ्यांना मातृभाषेतून शिक्षण घेता यावे, यासाठी चंदगड तालुक्‍यात शिवाजी विद्यापीठ संचालित नवे शासकीय महाविद्यालय सुरू केले जाणार आहे. यासाठी शिनोळी, तुडये, म्हाळुंगे या गावांत जागांची पाहणी केली आहे. लवकरच जागा निश्‍चित केली जाईल. नव्या शैक्षणिक वर्षापासून येथे प्रत्यक्ष अध्यापनाला सुरुवात होईल, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. शिवाजी विद्यापीठात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

श्री. सामंत म्हणाले, "चंदगड तालुक्‍यातील शिनोळी येथे दोन जागा आहेत. यात एका खासगी कंपनीची पायाभूत सुविधा असणारी इमारत भाडेतत्त्वावर घेण्याचा विचार आहे. याशिवाय तुडये, म्हाळुंगे गावातही जागांची पाहणी केली आहे. जागेची निश्‍चिती लवकरच करून नव्या शैक्षणिक वर्षात अध्यापन सुरू होईल. पहिल्या वर्षी प्रमाणपत्र असणारे कमी कालावधीचे कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रम मराठी माध्यमातून सुरू केले जातील. दुसऱ्या वर्षी पदविका आणि पदवी अभ्यासक्रमही सुरू होतील. यात पारंपरिक विद्याशाखांबरोबरच व्यावसायिक अभ्यासक्रमही शिकवले जातील. शिवाजी विद्यापीठ या महाविद्यालयाचे संचालन करेल.' 


आज शिवाजी विद्यापीठात शासकीय महाविद्यालयाबाबत बैठक झाली. यात खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर, राजेश पाटील, ऋतुराज पाटील उपस्थित होते. यानंतर विद्यापीठाची आढावा बैठक सामंत यांनी घेतली. या बैठकीत अनेक प्रश्‍नांवर चर्चा झाली. यात प्रामुख्याने सुवर्णमहोत्सवी निधी, विद्यापीठातील वर्ग 1 व 2 च्या अधिकाऱ्यांची वेतननिश्‍चिती, पदनामातील बदलाबदल, क्रीडा अधिविभागातील प्रशिकांच्या सहाव्या वेतन आयोगानुसार होणारी वेतननिश्‍चिती, तंत्रज्ञान विभागाला अभियांत्रिकी महाविद्यालय म्हणून मान्यता या सर्व विषयांवर चर्चा झाली. यावेळी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी मंत्री सामंत यांच्याशी चर्चा केली. 

कोर्स ठरवण्यासाठी समिती 
चंदगड तालुक्‍यात होणाऱ्या विद्यापीठ संचालित शासकीय महाविद्यालयातील कोर्स ठरवण्यासाठी एक समिती नेमली जाणार आहे. ही समिती या महाविद्यालयातील कोर्स, त्यांचा अभ्यासक्रम ठरवेल. पुढील वर्षी येथे पदवी अभ्यासक्रमही सुरू केले जातील. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com