'हे' 34 अधिकारी झाले कागल तालुक्यातील 'या' गावांचे सरपंच

Government officials have been given the charge of Sarpanch in kagal taluka
Government officials have been given the charge of Sarpanch in kagal taluka

कागल - ऑगस्ट अखेर कागल तालुक्यातील 34 ग्रामपंचायतींची मुदत संपली आहे. अशा ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचा कारभार आता प्रशासक सांभाळणार आहे. विविध विभागातील शासकीय अधिकाऱ्यांना या सरपंचपदाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे.

नैसर्गिक आपत्ती, युध्द, प्रशासकीय अडचणी, महामारी यामुळे राज्य निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार पंचायतीच्या निवडणूका घेणे शक्य झाले नसेल तर राज्य शासनास राजपत्रातील अधिसूचनेद्वारे अशा पंचायतीचा प्रशासक म्हणून योग्य व्यक्तीची नियुक्ती करण्याबाबत महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमामध्ये तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून योग्य व्यक्तीची नियुक्ती करण्याचे शासन स्तरावरील अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहेत. 7 ऑगस्ट अखेर मुदत संपणाऱ्या कागल तालुक्यातील 34 ग्रामपंचायतीचा कारभार सुरळीत चालण्याच्या दृष्टीने आज प्रशासक नियुक्ती करण्यात आली. 

ग्रामपंचायतीचे नावप्रशासक पुढीलप्रमाणे -

उंदरवाडी - अनुराधा चंद्रकांत दळवी (पर्यवेक्षिका), चिखली - सुरेश महादेव कुंभार (विअप), मळगे बुद्रुक - राजेंद्र बाबुराव सिद्धन्नावर (विअकृषी), व्हन्नूर - सारिका बाळासो किणेकर (शिक्षण विस्तार अधिकारी),  कुरुकली - सुरेश महादेव कुंभार ( विअप), बानगे - विद्या रणधीर लांडगे ( पर्यवेक्षिका), हसुर खुर्द - सुरेश महादेव कुंभार, बेलवळे  बुद्रुक - अमोल बाबुराव मुंडे ( वि अप), एकोंडी - सारिका बाळासो किणेकर (शिक्षण विस्तार अधिकारी), शंकरवाडी - सुरेखा भाऊ कांबळे (विअ सांख्यिकी), बिद्री - अमोल बाबुराव मुंडे,  हळदी - जयश्री किरण सनगर (पर्यवेक्षिका), आलाबाद - जयश्री किरण सनगर (पर्यवेक्षिका),  तमनाकवाडा - रामचंद्र विष्णू कांबळे (विस्तार अधिकारी शिक्षण), करंजिवणे - गोपाळ कल्लाप्पा कोळी (शाखा अभियंता), वडगाव - मारुती बापू यादव (शाखा अभियंता), बस्तवडे - राजेंद्र बाबुराव सिद्धन्नावर (विअ कृषी),  केनवडे - सूरय्या लालासाहेब मुल्लाणी (पर्यवेक्षिका ),  शिंदेवाडी - अनुराधा चंद्रकांत दळवी (पर्यवेक्षिका), शेंडूर - राजेंद्र बाबुराव सिद्धन्नावर (विअ कृषी), करनूर - सुनील शामराव कांबळे (कनिष्ठ अभियंता), म्हाकवे - अशोक बाबुराव पाटील (कनिष्ठ अभियंता), लिंगनूर दुमाला - मोहन बापू कोळी (शाखा अभियंता), मेतके - मोहन बापुसो कोळी (शाखा अभियंता), मळगे खुर्द - विजया भानुदास कुलकर्णी (पर्यवेक्षिका), साके - रामचंद्र शिंगाडी गावडे (शिक्षण विस्तार अधिकारी), कासारी - विजय वासुदेव कुलकर्णी (कनिष्ठ अभियंता), सिद्धनेर्ली - दिपक आनंदराव कुराडे (शाखा अभियंता), बोळावीवाडी - रामचंद्र विष्णू कांबळे  (शिक्षण विस्तार अधिकारी), हळदवडे - गोपाळ कल्लाप्पा कोळी  (शाखा अभियंता), बेनिक्रे- दिपक आनंदराव कुराडे (शाखा अभियंता), लिंगनूर कापशी - सुरेश महादेव कुंभार (विअप ), माध्याळ - सुरेश महादेव कुंभार (विअप),अर्जुनी - जयवंत नानासो सातवेकर ( कनिष्ठ अभियंता) 

प्रशासकपदी नियुक्त झालेल्या या व्यक्तींना मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1985 मधील तरतुदीनुसार सरपंच पदाचे अधिकार व कर्तव्य प्राप्त होणार आहेत. 

स्वप्नांवर पाणी फिरले...

प्रशासक पदासाठी गावागावात इच्छूक असलेल्या कार्यकर्त्यांनी मोठी फिल्डींग लावली होती. मात्र शासकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्तीमुळे इच्छूकांच्या स्वप्नांवर पाणी फिरले आहे.

संपादन - मतीन शेख

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com