अजूनही सांघिक खेळ मैदानापासून दुरच ; खेळाडूंचे वर्ष मात्र वाया 

सुयोग घाटगे 
Sunday, 15 November 2020

यामुळे खेळाडूंचे नुकसान होत आहे. उर्वरित खेळांना परवानगी मिळण्याची प्रतीक्षा खेळाडूंना आहे.

कोल्हापूर : लॉकडाउनमधून बाहेर पडून जनजीवन सामान्य होत आहे, मात्र खेळाडू मैदानापासून लांबच आहेत. अनेक वैयक्तिक इनडोअर खेळांच्या प्रशिक्षणाला आणि सराव शिबिराला शासनाने मान्यता दिली आहे; परंतु मैदानापासून अनेक सांघिक खेळांना अजूनही लांब ठेवले आहे. यामुळे खेळाडूंचे नुकसान होत आहे. उर्वरित खेळांना परवानगी मिळण्याची प्रतीक्षा खेळाडूंना आहे.

फुटबॉल, क्रिकेट, कबड्डी, हॉकीसारखे खेळ कोल्हापूरची ओळख आहे. अनेक गुणवंत खेळाडू यातून घडले आहेत. मात्र त्यासाठी त्यांना मैदाने उपलब्ध नसल्यामुळे सरावाविना खेळाडूंचे दिवस वाया जात आहेत. शासनाने अनेक इनडोअर खेळांना परवानगी दिली आहे. सोबतच जलतरण तलाव सुरु करण्यासही परवानगी दिली आहे. असे असताना मात्र मैदानावरील सरावाला आणि शिबिरांना मात्र अजूनही बंदी आहे. इतर खेळांना मिळालेल्या परवानगीने काही आशा पल्लवीत झाल्या असल्या तरीही मैदाने खुली करण्याचा निर्णय लवकर न झाल्यास खेळाडूंचे भवितव्य टांगणीला आहे.

हेही वाचा - भय्या माने यांची पुणे पदवीधर मतदारसंघातून माघार -

आयोजकांचे नुकसान

क्रिकेट आणि फुटबॉलच्या मागील हंगामातील स्पर्धा निम्म्यात बंद झाल्या आहेत. यात आयोजकांसह खेळाडूंचे नुकसान झाले आहे. अशातच मागील हंगामातील स्पर्धा पूर्ण कारण्यासह येत्या हंगामातील स्पर्धा आयोजनाचे शिवधनुष्य पेलावे लागणार आहे.

खेळाडूंचे वर्ष वाया 

अनेक सांघिक व वैयक्तिक प्रकारातील वयोगटात खेळण्याचे अनेक खेळाडूंचे स्वप्न भंगले आहे. मात्र, अजूनही काही खेळाडू येथील पाच महिन्यांत खेळून काही प्रमाणात स्पर्धेतील वयोमर्यादेच्या निकषासाठी पात्र ठरू शकतात.

"मैदाने सुरू होण्यासाठी शासनाच्या आदेशाची वाट बघावी लागणार आहे. इतर खेळांना परवानगी मिळाली आहे, तशीच मैदानी सांघिक खेळांना लवकरच मिळण्याची अपेक्षा आहे."

- चेतन चौगुले, अध्यक्ष, केडीसीए

 

हेही वाचा -  दिवाळी पाडव्यादिवशी मर्यादित वेळेत श्री अंबाबाई भाविकांसाठी होणार खुले -

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gpurp ground play not allowed for players causes players year dropped for this year waiting for start a ground in kolhapur