''शिवसैनिकांनो हीच वेळ यांना खाली खेचण्याची'' 

Graduation MLA Arun Lad and Teacher MLA Jayant Asgaonkar felicitated in kolhapur
Graduation MLA Arun Lad and Teacher MLA Jayant Asgaonkar felicitated in kolhapur

कोल्हापूर : महाविकास आघाडीच्या कार्यकर्ते, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पदवीधरांनी जीवाचे रानं करून पूणे पदवीधर मतदार संघातून अरुण लाड आणि शिक्षक मतदार संघातून प्रा. जयंत पाटील यांना भरघोष मतांनी विजयी केले आहे. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडी भक्कम झाली आहे. हाडाची काडं आणि रक्ताचं पाणी करत केलेल्या कष्टाला फळ मिळाले असल्याच्या भावना पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज व्यक्त केल्या. 

पुणे पदवीधर मतदार संघाचे विजयी झालेले पदवीधर आमदार अरुण लाड आणि शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांचा पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला. येथील महासैनिक दरबार हॉल येथे झालेल्या या कार्यक्रमाला शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, शिक्षण संस्था चालक, कार्यकर्त्यांनी उर्त्स्फुत प्रतिसाद दिला. 

पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, कार्यकर्त्यांच्या प्रयत्नामुळे या निवडणुकीत महाविकास आघाडीचा झेंडा फडकला आहे. पश्‍चिम महाराष्ट्रात संघटीत ताकद महाविकास आघाडीच्या मागे राहिली. या निवडणुकीत पाच जिल्ह्यातील पक्षीय ताकत गरजेची होती. त्यामुळं ही निवडणूक लढवली. गेल्या बारा वर्षात विरोधकांनी काम केलं नाही याचा दाखल देण्याचे काम मतदारांनी केले. 

ही निवडणूक बहुजन समाजाची नाही तर विशिष्ट विचारधारेचे आहे. असा समज विरोधकांचा होता. नागपूरचा 55 वर्षांचा इतिहास मोडून काढला. सहा महिन्यांपूर्वी जिल्हापरिषद सुद्धा जिंकलीय. शिवसैनिकांनो हीच वेळ यांना खाली खेचण्याची आहे असं आवाहन करू असे, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, या निवडणुकी महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी आणि कार्यकर्त्यांनी जीवाचे रान करत लढवली आहे. त्यामुळेच मताधिक्‍य वाढविले आहे. कार्यकर्त्यांनी न्याय देण्याची भूमिका घेऊन दोन्ही उमेदवारांना निवडून दिले आहे. 

आमदार चंद्रकांत जाधव म्हणाले, महाविकास आघाडीच्या माध्यमतून विजयी झालेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातील आमदारांमुळे राज्यात महाविकास आघाडीची ताकद वाढली आहे. हे सर्वजण भविष्यात नक्कीच चांगली कामगिरी करतील. 

आमदार ऋतुराज पाटील म्हणाले, पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातील निवडणुकीचे महाविकास आघाडीचा मेळावा याच महासैनिक दरबार हॉलमध्ये घेऊन रणशिंग फुंकले होते. आज विजयी सत्कार केला जात आहे. हे करत असतांना कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील पदवीधर आणि शिक्षकांनी चांगली साथ दिली. योग्य नियोजन आणि कार्यकर्ते, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पदवीधरांनी दाखवलेल्या विश्‍वासामुळे ही निवडणूक मोठ्या मताधिक्‍याने जिंकता आली. महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते जमिनीवर राहूनच काम करतात हा संदेश राज्यात गेला आहे. त्यामुळे यापुढेही असेच एकत्र राहून महाविकास आघाडीला बळकट करण्यासाठी कटिबद्ध राहू असा निर्धारही आमदार पाटील यांनी केला. 

आमदार राजेश पाटील म्हणाले, पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत सर्व कार्यकर्ते एकसंघपणे आणि उमेदीने कामाला लागून इतिहास घडविला. स्वच्छ चारित्र्य आणि समाजाशी बांधिलकी असलेले जयंत आसगावकर आणि अरुण लाड या दोन उमेदवार निवडून दिले आहे. 

आमदार प्रा. जयंत आसगावकर सत्काराला उत्तर देताना म्हणाले, सत्कार स्वीकारतांना आपल्याला महाविकास आघाडीचा अभिमान वाटतो. शिक्षकांनी आपल्यावर विश्वास ठेवला तो नक्कीच सार्थ ठरवला जाईल. शिक्षकांची प्रलंबित कामे आणि प्रश्‍न पालकमंत्री सतेज पाटील यांच्या सहकार्याने शिक्षणमंत्र्यांची भेट घेऊन पाठपुरावा केल्यामुळे मार्गी लागली आहेत. शिक्षकांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी चांगली कामगिरी करू असा विश्वासही आमदार आसगावकर यांनी व्यक्त केला. 

खासदार प्रा संजय मंडलिक म्हणाले, पदवीधर, शिक्षक मतदार संघाची निवडणूक म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब करणारी निवडणूक आहे. भविष्यात महाविकास आघाडीची वाटचाल ही महत्वपूर्ण असणार आहे. शेतकरी, कष्टकरी आणि सामान्य जनतेच्या पाठीशी महाविकास आघाडी खंबीरपणे राहील. 

आमदार अरुण लाड म्हणाले, आम्ही दोन्ही उमेदवारांना निवडून आणण्यासाठी सर्वजण कामाला लागले होते. सांगली जिल्ह्याबरोबरच कोल्हापूर जिल्ह्याचा या विजयात मोठा वाटा विजयात आहे. यापूर्वी निवडून गेलेल्यानी बारा वर्षात काही काम केले नाही. पदविधारांच्या समस्या जाणून घेतल्या नाहीत त्यामुळं मतदारांनी त्यांची जागा दाखवून दिली. 

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार म्हणाले, या निवडणुकीत शिवसेनेचा वाटा हा महत्वाचा आहे. यापुढेही शिवसेना पाठीशी खंबीरपणे उभी राहिल. यावेळी, महापौर निलोफर आजरेकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, शिक्षकनेते भरत रसाळे, दादासाहेब लाड, भैय्या माने, सरला पाटील, संध्या घोटणे, दिनकर जाधव, विजय देवणे, बाबासाहेब देवकर उपस्थित होते. 
 

संपादन - धनाजी सुर्वे 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com