कोरोनात गावबंदी, अन् आता पायघड्या 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 12 January 2021

गावकऱ्यांनी कोरोनाच्या काळात केलेल्या चांगल्या-वाईट कामाचा हिशेब देण्याची वेळ ग्रामपंचायत निवडणुकीत आली आहे.

पेड (सांगली) : कोरोनाच्या काळात पुणे, मुंबई यासह अन्य शहरातून गावाकडे परतणाऱ्या लोकांना गावात येऊ न देता गावाबाहेरील जिल्हा परिषद शाळा किंवा हायस्कूलमध्ये पंधरा दिवस मुक्कामी ठेवण्यात आलं होतं. अशा लोकांना ग्रामपंचायतीच्या मतदानाला बोलविण्याची वेळ उमेदवारावर आली आहे. 

गावकऱ्यांनी कोरोनाच्या काळात केलेल्या चांगल्या-वाईट कामाचा हिशेब देण्याची वेळ ग्रामपंचायत निवडणुकीत आली आहे. जुने वाद उकरून काढणे, जुन्या भांडणाचा वचपा काढणे, रुसवे-फुगवे, नफा नुकसान याचा हिशेब देण्याची जागा म्हणजे निवडणूक. त्यातल्या त्यात ग्रामपंचायत निवडणुकीत तर पिढ्यांचा वाद उफाळून येऊ शकतो. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी एक एक मतदान महत्त्वाचे ठरणार असल्याने बाहेरगावी नोकरी किंवा अन्य कामधंदा निमित्त गेलेल्या लोकांशी संपर्क सध्या सुरू झाला आहे. 

हेही वाचा- राजमाता जिजाऊ जयंती विशेष: ‘जिजाऊंच्या भूमिकेनं ‘स्ट्राँग’ बनवलं’ -

मतदानादिवशी येऊन जा असा निरोप पाठविला जात आहे. मात्र नोकरी, कामधंदा निमित्त बाहेरगावी गेलेले लोकांना कोरोनाच्या कालावधीमध्ये गावामध्ये येऊ नका तुमच्यामुळे आमच्या गावात कोरोना पसरू शकतो असा निरोप मागील चार महिन्यापूर्वी देणारे आता मात्र निवडणुकीत मतदान करण्यासाठी या अशा विनवण्या करू लागले आहेत. 

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gram panchayat election 2021 atmosphere sangli